Google चे कर्मचारी ऐकतात युजर्सचं प्रायवेट व्हॉईस रेकॉर्डिंग

- Advertisement -

नवी दिल्ली: गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. मात्र गुगलच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुगल युजर्सच्या सर्व गोष्टी ऐकतो. गुगलचे थर्ड पार्टी कर्मचारी युजर्सचे वैयक्तिक संवाद ऐकतात. तसेच ते संवाद रेकॉर्डही केले जातात अशी माहिती आता समोर आली आहे. 

गुगल होम स्मार्ट स्पीकर या गुगलचे सेवेचे कर्मचारी युजर्सच्या फोनमध्ये असलेले वैयक्तिक ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकतात. गुगलनेही हे मान्य केलं आहे. मात्र गुगलने यामागेचं कारण सांगितलं आहे. स्मार्ट स्पीकर हे वेगवेगळ्या भाषांमधून ट्रान्स्क्राईब ही सेवा पुरवतं. या सेवेत विविध स्थानिक भाषांमधून बोलणं ऐकून त्यांचे अर्थ लावण्याचं काम केलं जातं आणि त्यानुसार या फीचरमध्ये सुधारणा व्हावी या हेतूने हे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकलं जात असल्याची माहिती गुगलने दिली आहे. हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

युजर्सच्या ऑनलाईन अ‍ॅक्टीव्हिटीवर गुगलचं लक्ष असतं. युजर्स ऑफिसला जाण्यासाठी कोणतं मेट्रो स्टेशन गाठतात. त्यादरम्यान स्मार्टफोनवर बातम्या वाचता किंवा गाणी ऐकता याबाबत गुगलकडे माहिती असते. तसेच गुगल मॅप्स मदतीने लोकेशन ट्रॅक केलं जातं. जीपीएस आपल्या आयपी अ‍ॅड्रेसबरोबर कॉर्डिनेट करतो. गुगल आपल्याला ट्रॅक करण्यासाठी सेल टॉवर्स आणि वाय-फाय एक्सेस पॉईंटचाही उपयोग करु शकतो. गुगल युजर्सच्या सर्च इतिहास रेकॉर्ड करतात. युजर्सच्या आवडीनुसार त्यांना माहिती उपलब्ध करून देतात. गुगल युजर्सचे ई-मेल स्कॅन करतात. त्यानुसार त्या ई-मेलच्या आधारावर जाहिराती पाठवतात. स्मार्टफोनमध्ये थर्ड पार्टी अ‍ॅप युजर्स वापरत असतील तर त्याची ही माहिती गुगलकडे असते. 

Google कडे आहेत युजर्सच्या प्रत्येक ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्स

ऑनलाईन शॉपिंग करण्याला अनेकजण प्राधान्य देतात. मात्र फार कमी जणांना माहीत असेल की Google कडे युजर्सच्या प्रत्येक ऑनलाईन शॉपिंगचे डिटेल्स असतात. शॉपिंगच्या बिलची रिसीट आपल्या जी-मेल अकाऊंटवर पाठवून गुगलला याबाबतची माहिती युजर्सचं देत असतात. त्यामुळे या रिसीटच्या माध्यमातून गुगल युजर्सच्या ऑनलाईन शॉपिंगवर नजर ठेवून असतं. सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, युजर्स किती पैसे खर्च करतात याची माहिती गुगलला एका प्रायवेट वेब टूलच्या मदतीने मिळते. मात्र या माहितीचा उपयोग ते जाहिरातीसाठी करत नाहीत. कंपनीने 2017 मध्ये जीमेल मेसेजमधून डेटा एकत्र करून त्याचा वापर हा जाहिरातीसाठी करण्याचं बंद केल्याचं कंपनीने म्हटलं आहे. गुगलने द वर्जला दिलेल्या माहितीनुसार, युजर्सना एकाच जागी त्यांनी केलेली खरेदी,  बुकिंग किंवा सबस्क्रिप्शन सहजपणे दिसण्यासाठी एक प्रायव्हेट डेस्टिनेशन तयार केलं आहे आणि ते फक्त युजर्सना दिसतं. युजर्स ही माहिती कधीही डिलीट करू शकतात असं ही कंपनीने म्हटलं आहे. 

गुगलकडे सिस्टंटच्या मदतीने व्हॉईस कमांड्स देऊन अलार्म सेट करणं, हवामानाचा अंदाज घेणं किंवा घरातली इतर उपकरणं हाताळणं यासारखी कामंही करता येतात. हे सगळं करत असताना युजर्सची  सुरक्षितता महत्त्वाची असते. मात्र गुगलकडे युजर्सनी दिलेल्या सर्व कमांड्सचे रेकॉर्डिंग असते. गुगल प्रत्येक व्हॉईस कमांड रेकॉर्ड करत असतं आणि या सर्व कमांड सर्व्हरवर साठवून ठेवलेल्या असतात. गुगलने स्टोअर करून ठेवलेले सर्व रेकॉर्डींग हे युजर्स ऐकू शकतात. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवेत आवश्यक ते बदल करता यावेत यासाठी हा डाटा सेव्ह केला जातो. असं असलं तरी गुगल असिस्टंटवरील हिस्ट्री डिलीट करण्याचा पर्यायही युजर्सकडे उपलब्ध आहे. 


- Advertisement -