हायलाइट्स:
- गुजरातच्या साणंदस्थित बलियादेव मंदिरावर जलाभिषेकचं आवाहन
- ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग
- व्हिडिओ-फोटो सोशल मीडियावर व्हायरल
करोनाला पळवण्यासाठी गुजरातच्या साणंदस्थित बलियादेव मंदिरावर जल अभिषेक करण्याचं जनतेला आवाहन करण्यात आलं होतं. या प्रकरणात सोशल डिस्टन्सिंगचा चांगलाच फज्जा उडालाय.
या उत्सवाचे अनेक फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी मास्कचाही वापर केलेला दिसत नाही. तसंच मंदिराच्या जल अभिषेकाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर हे फोटो – व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतलीय. या प्रकरणी २३ जणांवर कारवाई करण्यात आलीय. पोलिसांनी ‘आपत्कालीन कायद्याखाली’ आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केलीय. अहमदाबाद ग्रामीणचे डेप्युटी एसपी के टी कमारिया यांनी ही माहिती दिलीय.
सरकारी आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये सध्या १ लाख ४८ हजार २९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत राज्यात ७७७९ जणांनी आपले प्राण करोनामुळे गमावले आहेत. बेड, वेळेत उपचार आणि ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत ६ लाख २० हजार ४७२ जणांना करोनानं गाठलंय.