
नवी दिल्लीः देशात करोनाने स्थिती किती गंभीर होत चालली आहे याचा अंदाज तुम्हाला आकडल्यांवरून (
coronavirus india ) घेता येईल. करोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या जगातील ५० देशांतील करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या एकत्र केल्यास ती ३.९१ लाख इतकी आहे. तर गेल्या २४ तासांच भारतात आढळून आलेल्या नवीन रुग्णांची संख्या ही ३ लाख ९२ हजार ४५९ इतकी आहे. म्हणजेच ५० देशांमधील करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या एकत्र केली तरी त्याहून अधिक संख्या ही एकट्या भारतात आहे.
गेल्या २४ तासांत दिलासा देणाऱ्या २ बातम्या आल्या आहेत. पहिली म्हणजे शुक्रवारच्या तुलनेत संसर्ग होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ९५५५ ने कमी दिसून आली आहे. देशात शुक्रवारी विक्रमी ४ लाख २ हजार १४ इतके नवीन रुग्ण आढळून आले होते. ही संख्या शनिवारी कमी होऊन ३ लाख ९२ हजार ४५९ इतकी आहे. दुसरीकडे गेल्या २४ तासांत जगात सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. भारतात मृतांची संख्याही ३६८४ इतकी झाली आहे. ब्राझीलमध्ये करोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही २२७८ इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर आमेरिका आहे. अमेरिकेत शनिवारी ६६१ जणांचा मृत्यू झाला आहे.
coronavirus : दाखल करोना रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉलची व्यवस्था करा, केंद्राचे राज्यांना नि
पहिल्यांदाच एका दिवसात ३ लाखाहून अधिक रुग्ण बरे
शनिवारी करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे अधिक होते. पहिल्यांदाच एका दिवसात ३ लाखाहून अधिक नागरिक बरे झाले. देशात शनिवारी ३ लाख ८ हजार ५२२ जण करोनामुक्त झाले. जगात कुठल्याच देशात इतरे रुग्ण बरे झाले नाही. यापूर्वी शुक्रवारी २.९९ लाख नागरिक करोनामुक्त झाले होते.
‘कुंभा’त ७० लाख भाविकांचा सहभाग, १.९० लाख चाचण्या तर २६४२ करोनाबाधित
Source link