Indian Idol 12- अंजली गायकवाडला एलिमिनेट केल्यानं युझर भडकले, काँग्रेस नेत्यानंही केलं ट्वीट

Indian Idol 12- अंजली गायकवाडला एलिमिनेट केल्यानं युझर भडकले, काँग्रेस नेत्यानंही केलं ट्वीट
- Advertisement -


हायलाइट्स:

  • अंजली गायकवाड इंडियन आयडल १२ मधून बाहेर
  • अंजलीच्या चाहत्यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी, शनमुखा, दानिशला केले ट्रोल
  • काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यानेही अंजलीला परत घेण्याबाबत केले ट्वीट

मुंबई : ‘इंडियन आयडल १२’ कार्यक्रम दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेला आहे. इंडियन आयडल १२ मधून नचिकेत लेले याला एलिमिनेट केल्यानंतर आता अंजली गायकवाड हिला बाहेर काढले आहे. त्यामुळे तिचे चाहते कमालीचे नाराज झाले आहे. अंजलीच्या चाहत्यांना तिचे गाणे खूप आवडते. कार्यक्रमाचे परीक्षक, येणारे पाहुणेदेखील अंजलीच्या गायकीचे भरभरून कौतुक करायचे. त्यानंतरही अंजलीला या कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले, त्यामुळे तिचे चाहते खूपच नाराज झाले आहेत. इतकेच नाही तर कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी तिला कार्यक्रमात परत घ्यावे अशी मागणी केली आहे.


चाहत्यांनी असा काढला राग

अंजलीला कार्यक्रमातून एलिमिनेट केल्यानंतर तिच्या चाहत्यांना राग अनावर झाला आहे. त्यांनी आपला राग शनमुखा प्रिया आणि दानिशवर काढला. गेल्या आठवड्यात प्रसारित झालेल्या कार्यक्रमात शनमुखा प्रियाने आशा भोसले यांनी गायलेले ‘चुरा लिया है तुमने’ हे गाणे तिने गायले. परंतु तिने ज्या पद्धतीने हे गाणे सादर केले ते प्रेक्षकांना अजिबातच आवडले नाही. त्यांनी शनमुखाला कार्यक्रमातून काढून टाकण्याची मागणी केली. शनमुखा आणि दानिश चांगल्या गाण्याची अतिशय वाट लावतात, असा आरोपही अनेक युझरने सोशल मीडियावर केला.


एका युझरने लिहिले की, ‘जेव्हा शनमुखा गाणे गायला येते तेव्हा आम्ही टीव्ही म्युटवर ठेवतो. जुन्या काळीतील सुमधूर गाण्यांची वाट लागणे ऐकवत नाही. सॉरी. खरेच तुम्हाला वाटते का शनमुख प्रिया अंजलीपेक्षा जास्त चांगली गायिका आहे? चॅनेलवाल्यांनो तिला परत बोलवा…’

आणखी एका युझरने लिहिले की, ‘प्लीज निर्मात्यांना एक विनंती आहे की, शनमुखा प्रियाला कार्यक्रमातून काढून टाका. ती अतिशय वाईट गाणे गाते. आम्ही आतापर्यंत सर्वोत्तम कार्यक्रम पाहिले आहे. परंतु शनमुखा आणि दानिश असलेला हा कार्यक्रम बघवत नाही. खरे तर आम्हाला हा कार्यक्रम आवडतो.’

शनमुख प्रियाचं ‘चुरा लिया है तुमने’ गाण ऐकूण नेटकऱ्यांची सटकली; म्हणाले …

अजय माकन यांनीदेखील केले ट्वीट

या सर्व गोष्टींवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी देखील त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्वीट केले आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘हा अतिशय कठीण काळ आहे. प्रत्येक फोन आणि सोशल मीडियावरची प्रत्येक पोस्ट घाबरवणारी आहे. काय सुरू आहे काहीच कळत नाही. काही तास आम्ही संगीत विश्वाची सफर करतो. कार्यक्रमातील कोणताही स्पर्धक एलिमिनेट होऊ शकत नाही.’ असे म्हणत अयज माकन यांनी #AnjaliGaikwad ला परत आणा असे आवाहन केले आहे.


अंजली आहे सारेगमपा लिटिल चॅम्पची विजेती

अंजली गायकवाड ही अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण वडीलांकडूनच घेतले आहे. इंडियन आयडल १२ मधील सर्वात कमी वय असलेली ती स्पर्धक होती. अंजली २०१७ मध्ये ‘ सा रे ग म पा लिटील चॅम्प ‘ या स्पर्धेची ती विजेती होती. अंजलीचे वडील आणि बहीण देखील गायिका आहे. दोन्ही बहिणी आणि त्यांच्या वडिलांनी स्टेजवर एकत्र कार्यक्रम केले आहेत. दरम्यान, ‘इंडियन आयडल १२’ कार्यक्रमात अंजलीला पॉवर प्लेमध्ये कमी मते मिळाल्याने अंजलीला कार्यक्रमातून बाहेर पडावे लागले. आता या कार्यक्रमामध्ये पवनदीप राजन, मोहम्मद दानिश, शनमुखा प्रिया, अरुणिता कांजीलाल, आशीष कुलकर्णी, सायली कांबळे, सवाई भाट आणि निहाल तारो हे स्पर्धक राहिले आहेत.

AssignmentImage-950187272-1623065138





Source link

- Advertisement -