हायलाइट्स:
- इंडियन आयडल १२ मध्ये कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू प्रमुख पाहुणे म्हणून येणार
- सर्व स्पर्धकांनी गायली या दोघांची लोकप्रिय गाणी
- स्पर्धकांबरोबर सर्व परीक्षक आणि प्रमुख पाहुण्यांनी घेतला गाण्याचा आनंद
या आठवड्याअखेरीस प्रसारित होणाऱ्या भागामध्ये सर्व स्पर्धक लोकप्रिय गाणी गाणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम स्पर्धक, परीक्षक आणि प्रमुख पाहुण्यांसाठी संस्मरणीय ठरणार आहेत. याशिवाय कार्यक्रमाचा सूत्रसंचालन करणारा आदित्य नारायण देखील दर्शकांसाठी काही छान आठवणी सांगणार आहे.
बप्पी लहिरी पुन्हा पाहुणे म्हणून येणार
आठवड्याअखेरीस इंडियन आयडल १२ कार्यक्रमात सर्व स्पर्धक कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांची गाणी गाणार आहेत. या दोघांसोबत या कार्यक्रमात संगीतकार बप्पी लाहिरी देखील पुन्हा एकदा सहभागी होणार आहेत. यावेळी अरुणिता कांजीलाल हिचे गाणी बप्पी दा यांना खूपच आवडले असून त्यांनी तिला त्यांच्यासोबत गाण्याची संधी दिली. अरुणितासाठी हा क्षण नक्कीच अविस्मरणीय असणार आहे.
नेहा कक्कर गरोदर ?
नेहा कक्कर अनेक दिवसांपासून इंडियन आयडल १२ कार्यक्रमात परीक्षक म्हणून सहभागी झालेली नाही. तिच्या जागी परीक्षक म्हणून सोनू कक्कर सहभागी झाली आहे. नेहा गरोदर असल्यामुळे कार्यक्रमात दिसत नसल्याची चर्चा आहे. अद्याप या वृत्ताला नेहाने अथवा तिच्या नवऱ्याने रोहनप्रीतने दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, नेहा कक्करच्या चाहत्यांनी तिने या कार्यक्रमात लवकर परतावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेला तरी नेहा या कार्यक्रमात सहभागी होईल, अशी अपेक्षाही तिचे चाहते व्यक्त करत आहेत.