Home मनोरंजन Indian Idol 12- जावेद अख्तर, अनु मलिक यांच्या परीक्षेत पास होणार का अरुणिता कांजीलाल?

Indian Idol 12- जावेद अख्तर, अनु मलिक यांच्या परीक्षेत पास होणार का अरुणिता कांजीलाल?

0
Indian Idol 12- जावेद अख्तर, अनु मलिक यांच्या परीक्षेत पास होणार का अरुणिता कांजीलाल?

[ad_1]

मुंबई : इंडियन आयडल १२ कार्यक्रमात आता सात स्पर्धक उरले आहेत. या सर्वच स्पर्धकांनी आपल्या आवाजामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. या कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांनी देखील या सर्व स्पर्धकांचे भरभरून कौतुक केले आहे. याआठवड्याअखेरीस प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या भागामध्ये ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर प्रमुख पाहुणे म्हणून दिसणार आहेत. कार्यक्रमाच्या या भागाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. कार्यक्रमात आतापर्यंत एक न झालेली गोष्ट या भागात घडली आहे…

इथं सारं काही आहे फेक; रिअॅलिटी शोमध्ये दाखवल्या जातात खोट्या प्रेमकहाण्या
काय नेमके घडले

इंडियन आयडल १२ च्या या भागात एक वेगळीच घटना घडली. प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या जावेद अख्तर यांनी खास अरुणितासाठी एक गाणे लिहिले आहे. या गाण्याला अनु मलिक यांनी संगीत दिले. त्यामुळे एकप्रकारे या दोघांनी मिळून अरुणिताची परीक्षाच घेतली आहे. या दोघांच्या परीक्षेमध्ये अरुणिता यशस्वी ठरली की नाही हे या भागातच कळणार आहे.


सोनी टीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये अरुणिताचे गाणे ऐकल्यानंतर जावेदजी म्हणतात, ‘अरुणितासाठी एक गाणे लिहियला हवे…’ जावेद यांचे हे म्हणणे ऐकून अनु मलिक त्यांना अनुमोदन देतात. त्यानंतर जावेदजी लगेचच एक नवीन गाणे लिहितात. तर अनु मलिक त्या गाण्याला संगीत देतात.

शनमुख प्रिया ही माझी मुलगीच आहे असं म्हणत उदीत नारायण यांनी गायलं खास गाणं
त्यानंतर अनु मलिक अरुणिताला ते गाणे ऐकवतात आणि नंतर तिला ते गायला सांगतात. अशाप्रकारे अरुणिताची सुरुवात तर चांगली झाली आहे. आता या आठवड्याअखेरीस प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या या भागामध्ये जावेद अख्तर यांच्या शब्दांना आणि अनु मलिक यांच्या संगीताला अरुणिताने किती न्याय दिला आहे आणि त्या दोघांच्या परीक्षेला ती कशी सामोरी गेली आहे.


सिनेविश्वातील या दोन दिग्गजांनी तयार केलेले गाणे गाण्याची संधी अरुणिताला मिळाल्याने ती खूपच आनंदीत झाली. याबद्दल सांगताना ती म्हणाली, ‘अशी संधी आयुष्यात एकदाच मिळते. मी इंडियन आयडलची खूप आभारी आहे. त्यांच्या मंचामुळे ही संधी मला मिळाली आहे. जावेद अख्तर सरांचेदेखील मी खूप ऋणी आहे त्यांनी मला गाणे गाण्याची संधी दिली. तसेच अनु मलिक सरांचीदेखील आभारी आहे. मला आता असे वाटते आहे की मी जीवनात आता सगळे काही मिळवले आहे. कार्यक्रमाचा हा भाग माझ्यासाठी खूप खास आहे.’



[ad_2]

Source link