Home मनोरंजन Indian Idol 12 मधून बाहेर आल्यावर अंजली गायकवाडनं दिली कार्यक्रमाबद्दलची प्रतिक्रिया

Indian Idol 12 मधून बाहेर आल्यावर अंजली गायकवाडनं दिली कार्यक्रमाबद्दलची प्रतिक्रिया

0
Indian Idol 12 मधून बाहेर आल्यावर अंजली गायकवाडनं दिली कार्यक्रमाबद्दलची प्रतिक्रिया

[ad_1]

हायलाइट्स:

  • एलिमिनेट झाल्यानंतर अंजली गायकवाडने व्यक्त केली प्रतिक्रिया
  • अंजली गायकवाड बाहेर पडल्यावर प्रेक्षकांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
  • सोशल मीडियावर निर्मात्यांच्या हेतूबद्दलही घेतली होती शंका

मुंबई : ‘इंडियन आयडॉल १२’ हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरत आहे. हा वाद कधी यातील परीक्षकांवरून तर कधी सूत्रसंचालकाच्या वादग्रस्त वक्तव्यावरून होतो. हे कमी की काय कधी स्पर्धकांच्या गायनशैलीवरूनही वाद निर्माण होतात. अलिकडेच वयाने सर्वात लहान असलेली स्पर्धक अंजली गायकवाड ही कार्यक्रमातून एलिमिनेट झाली. त्यामुळे प्रेक्षक खूप नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली.

Indian Idol 12- अंजली गायकवाडला एलिमिनेट केल्यानं युझर भडकले, काँग्रेस नेत्यानंही केलं ट्वीट

इंडियन आयडल १२ मधून अंजली एलिमिनेट झाल्यामुळे प्रेक्षकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. संताप व्यक्त करताना त्यांनी कार्यक्रमाच्या हेतूवर आणि एकूण त्यातील एलिमिनेशच्या प्रक्रियेबद्दल आक्षेप घेतले. अनेकांनी सोशल मीडियावर कार्यक्रमाबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला. काहींनी तर लिहिले की, अंजली ऐवजी शनमुखाप्रियाला कार्यक्रमातून बाहेर काढायला हवे होते. तर काहींनी हा कार्यक्रमत खोटा असल्याचा थेट आरोप केला आहे.


काय म्हणाली अंजली

इंडियन आयडल १२ कार्यक्रमातून एलिमिनेट झाल्यानंतर अंजली गायकवाडने या कार्यक्रमाबद्दल मत व्यक्त केले आहे. तसेच तिच्या एलिमिनेशवरही ती बोलली आहे. अंजलीने सांगितले, ‘ पहिल्या दोन- तीन महिन्यांमध्ये आम्हा सर्व स्पर्धकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. जसा हा कार्यक्रम पुढे गेला, तशी या कार्यक्रमाबद्दल नकारात्मक बातम्या सातत्याने येऊ लागल्याने त्याबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे प्रेक्षकांनी कार्यक्रमाला ट्रोल करायला सुरुवात केली.’

शनमुख प्रियाचं ‘चुरा लिया है तुमने’ गाण ऐकूण नेटकऱ्यांची सटकली; म्हणाले …

आम्ही दुर्लक्ष केले!

अंजलीने पुढे सांगितले, ‘मला कुणाचेही नाव घ्यायचे नाही. परंतु काहींनी तर थेट निर्मात्यांवरच शंका घेतली आणि सांगितले की ते फक्त एका व्यक्तीलाच प्रसिद्धी देत आहेत बाकीच्यांना नाही. परंतु, आम्ही सगळ्यांनीच या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. सर्व नकारात्मक गोष्टींकडे कानाडोळा करत फक्त आमच्या गाण्यावर लक्ष केंद्रीत केले. कारण आम्ही गायक आहोत आणि गाण्यातूनच आम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी झालो आहोत. बाकीच्या गोष्टींशी आमचे काहीच देणे घेणे नव्हते.’


सोशल मीडियावर कुणी काहीही बोलू शकते

अंजली पुढे म्हणाली, ‘आम्ही काय कुणीच सोशल मीडियावर युझर काय बोलतात त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे मी सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या कमेन्टकडे दुर्लक्ष केले आणि फक्त गाण्यावर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळेच मी टॉप-९ मध्ये येऊ शकले. माझ्यासाठी ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. येथे येण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे.

Indian Idol 12- पनवदीपवर कार्यक्रमात झाला अन्याय? अरुणिता झाली ट्रोल

शास्त्रीय गायन करायचेय…

इंडियन आयडल १२ कार्यक्रमाच्या अंतिम सोहळा जवळ आला असतानाच बाहेर पडली याचे वाईट वाटते का, असे विचारले असते अंजली म्हणाली, ‘वाईट तर नक्की वाटले. परंतु कार्यक्रमातून कुणीतरी एलिमिनेट होणार हे नक्की होते. कार्यक्रमाचा नियमच तो होता. आता त्यात माझे एलिमिनेशन झाले. हा निर्णय मला मान्य आहे. त्यावर मला आणखी काहीही बोलायचे नाही. एलिमिनेशन झाल्यावर वडिलांनी मला धीर दिला आणि सांगितले तुला अजून खूप गाणे शिकायचे आहे. तुझा भविष्यकाळ खूप उज्ज्वल आहे. त्यांच्या या शब्दांनी माझा आत्मविश्वास वाढवला. आता मी आणखी कठोर परिश्रम घेणार आहे. मला शास्त्रीय संगीतामध्ये करिअर करायचे आहे. त्यासाठी मेहनत घेण्याची माझी तयारी आहे. भविष्यात मला शास्त्रीय गाण्याचे कार्यक्रम करायचे आहेत.’



[ad_2]

Source link