Inter district Crime Co-ordination border

- Advertisement -

पुणे : परवेज शेख

दिनांक २१/०८/२०१९ रोजी सकाळी १०.०० ते १४.०० वाजेपर्यंत पोलीस आयुक्त कार्यालय, कान्फरन्स हॉल
येथे मा.डॉ.के.व्यंकटेशम्, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे अध्यक्षतेखाली पुणे पोलीस आयुक्तालय व लगतच्या जिल्हा।
पोलीस अधिक्षक यांचेत “
Inter district Crime Co-ordination border conference” संपन्न झाली.

बैठकीस खालील अधिकारी तसेच जिल्हयाकडील स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक हजर होते.

१. डॉ. रविंद्र शिसवे, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर,
२. श्री. सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर
३. श्री संदीप पाटील, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
४. श्री. ईशू सिंधू, पोलीस अधीक्षक, अहमदनगर
५. श्री. मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
६. श्री. बापू बांगर, पोलीस उप आयुक्त, गुन्हे सोलापूर शहर,
७. श्री. दिपक साकोरे, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे.
८. श्री. सुधीर हिरेमठ, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड
९. श्री. बच्चन सिंग, पोलीस उप आयुक्त, गुन्हे. पुणे शहर
१०.श्री. संभाजी कदम, पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर, गुन्हे. पुणे शहर
११. श्री. मितेश घट्टे, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर.
१२. श्री. अजित टिके, उप विभागीय पोलीस अधिकारी, वाई उप विभाग, वाई, जि.सातारा.

बैठकीमध्ये डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी “Inter district Crime Co-ordination border conference” घेणे बाबतचा उद्देश उपस्थित अधिका-यांना सांगितला. गुन्हेविषयक, कायदा व सव्यवस्थाविषयक, गुप्तवार्ताविषयक तसेच इतर बाबींची माहिती लगतच्या जिल्हा पोलीसाना आदान प्रदान होवून त्याची चांगली परिणीती होण्याची संकल्पना सांगितली तसेच यापुढे सदर विषयांवर माहिती देवाण-घेवाण करणेकरिता अधिक यांचे व्हॉटसअॅप ग्रुप तयार करणेकरिता सूचीत केले तसेच लगतच्या जिल्हयांनी चैन-स्नेचिंग, वाहनचोरी, घरफोडी चोरी
करणारे गन्हेगार/ टोळया याची माहिती आजू-बाजूच्या जिल्हयांना पुरविल्यास निश्चीतपणे सदर गुन्हयांना प्रतिबंध होणेस।
मदत होणार असलेचे स्पष्ट केले.
१ बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या नगर, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक व पोलीस उपआयुक्त गुन्हे
पिंपरी चिंचवड आयक्तालय यांनी जिल्हयामध्ये दाखल गुन्हयांची माहिती दिली. तसेच कायदा व सुव्यवस्था प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.
२. तडीपार गुन्हेगारांवर देखरेख ठेवणे बाबत सुचित करण्यात आले.
३. कायदा व सुव्यवस्था व गुन्हे नियंत्रण व प्रतिबंध अनुषगान सविस्तर चर्चा व अनुभवांची देवाणघेवाण करण्यात आली
४. गुन्हेगारांवर वॉच ठेवायचे उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.
५. गुन्हेगारांचा ‘DATA BASE’ शेअर करणे बाबत चर्चा करण्यात आली.
६. बैठकीमध्ये नगर-दौंड रोड वाळू माफिया व गुन्हेगारांवर संयुक्तिक छापा टाकून कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात
आला.
७. लगतच्या जिल्हयांसह संयुक्तिकपणे नाकाबंदीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

८. बेकायदा अग्निशस्त्रे बनविणारे कारखाने, बेकायदा अग्निशस्त्रांचा पुरवठा करणारे गुन्हेगार यांचेवर संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार आहे.
९. घरफोडी/वाहनचोरी/चेन स्नॅचिंग यावत माहिती देवाण-घेवाण करण्यात आली व करावयाचे उपाययोजना बाबत चर्चा करण्यात आली.
१०. येरवडयामधुन सुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांविषयी तसेच त्यावेळी लोक जमण्यांच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी
संघटीतपणे संबंधीत घटक/ जिल्हा यांचेसोबत संयुक्तपणे कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले.
११. सोशल मिडीया मॉनिटरींग सेल हे आक्षेपार्ह पोस्ट/संदेश यायावत केलेल्या तपासाची माहिती लगतच्या सर्व जिल्यातील पोलीसांना शेअर करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.

श्री. रविंद्र शिसवे पोलीस सह आयुक्त, पुणे शहर यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात ‘सी’ वॉच, स्पॉटर किट इत्यादि उपक्रमांची माहिती देवून मागणी केल्यास सदर उपक्रमाव्दारे जिल्हयातील आवश्यक माहिती पुरविण्याचे आश्वासित केले.

श्री. सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर यांनी जिल्हयातील खंडणी मागणा-या गुन्हेगारी टोळया, बेकायदा सावकारी करणा-या टोळया, इंडस्ट्रीजमध्ये हप्ता मागणा-या गुन्हेगारी टोळया यांची जिल्हानिहाय, मोबाईल क्र.
सह अदयावत यादी तयार करणे आजूबाजूच्या जिल्हयांना प्रदान केल्यास त्यानुसार मोका कारवाई करणे सोयीस्कर होणार असल्याचे सूचित केले. तसेच वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्यानंतर चोरीस गेलेली वाहने कोठून प्राप्त केली.
या बाबत तपास केल्यास चोरीची वाहने विक्री ठिकाणे रेकॉर्डवर आणून त्याची माहिती नजीकच्या जिल्हयांना देण्यात येईल
असे सूचीत केले.

बैठकीअंती सिमेवरील सर्व जिल्हयांची गुन्हेगारांची माहिती ही पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये सॉप्टवेअर मध्ये
संकलित करून, सदर सॉप्टवेअर लॉगीन व पासवर्ड सर्व जिल्हा प्रमुखांना तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. यांना दिल्यास गुन्हेगारांची आवश्यक माहिती जिल्हयांना उलपब्ध होवू शकते या संकल्पनेवर पुढील कार्यवाही करण्यात येईल
असे श्री. रविंद्र शिसवे, पोलीस सह-आयुक्त,पुणे शहर यांनी सांगितले.

बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या अधिका-यांचे आभार प्रदर्शन श्री. बच्चनसिंग, पोलीस आयुक्त,गुन्हे,पुणे शहर
यांनी केले आहे.

- Advertisement -