Home ताज्या बातम्या Jammu and Kashmir : कलम ३७० हटवल्यानंतर फारुख अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Jammu and Kashmir : कलम ३७० हटवल्यानंतर फारुख अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

0

श्रीनगर: काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारने संसदेत दिला आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल काँफ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली असून, भारताने काश्मीरला दगा दिला असून, कलम ३७० हटवणे हे लोकशाही विरोधी असल्याचे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. 

काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर फारुख अब्दुल्ला यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ”असा भारत आम्हाला अपेक्षित नव्हता. आम्हाला सेक्युलर भारत अपेक्षित होता. कलम ३७० बाबत आज भारताने काश्मीरला दगा दिला आहे. कलम ३७० हटवणे ही लोकशाहीविरोधी कृती आहे. या विरोधात आम्ही न्यायायालयात धाव घेऊ,” असे फारुख अब्दुल्ला यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.

दरम्यान, आपल्याला नरजकैदेत ठेवण्यात आले असल्याचा दावाही फारुख अब्दुल्ला यांनी केला. मात्र फारुख अब्दुलांना अटक करण्यात आलेली नाही किंवा त्यांना नजरकैदेतही ठेवलेले नाही, ते आपल्या मर्जीने घरी राहिले आहेत, असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दिले.