Home बातम्या राष्ट्रीय Jio चा COAI वर आरोप, ‘सरकारला लिहिलेल्या पत्रात आमच्या मताचा समावेश नाही’

Jio चा COAI वर आरोप, ‘सरकारला लिहिलेल्या पत्रात आमच्या मताचा समावेश नाही’

0

नवी दिल्ली : टेलिकॉम क्षेत्रातली मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स जिओ ने COAI म्हणजेच सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने दूरसंचार विभागाला लिहिलेल्या पत्राला उत्तर दिलं आहे. टेलिकॉमचं क्षेत्र कोणत्याही प्रकारे संकटात नाही, असं रिलायन्स जिओ ने म्हटलं आहे.

रिलायन्स जिओ या पत्रात लिहिलं आहे, COAI ने दूरसंचार विभागाला लिहिलेल्या पत्रात आमच्या मताचा समावेश नाही. COAI ने फक्त दोन कंपन्यांना साथ दिली, असा आरोपही जिओ ने केला आहे.

COAI ही संघटना फक्त दोन प्रमुख टेलिकॉम कंपन्यांचं मुखपत्र बनलं आहे. त्यामुळे COAI ही औद्योगिक संघटना वाटत नाही, असंही जिओने म्हटलं आहे.

दूरसंचार विभागाला लिहिलेल्या पत्रात करण्यात आलेल्या सगळ्या आरोपांचं ‘जिओ’ने खंडन केलं आहे.

Jio ने म्हटलं आहे, केवळ दोन ऑपरेटर कंपन्यांच्या अपयशामुळे टेलिकॉम क्षेत्रावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्याचबरोबर सरकारचं डिजिटायझेशन आणि सरकारी उपक्रमांवरही परिणाम झालेला नाही.

COAI ने दूरसंचार विभागाला लिहिलेल्या पत्रात टेलिकॉम क्षेत्रात आर्थिक दबाव असल्या कारणाने निर्माण झालेल्या समस्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

जिओ ने COAI वर चुकीची माहिती देण्याचा आरोप केला आहे. जिओ ने सुप्रीम कोर्टाचा एक आदेश COAI च्या निदर्शनास आणून दिला आणि म्हटलं, ऑपरेटर्सकडे एवढी क्षमता आहे की ते बाकी असलेले सगळे पैसे सरकारकडे भरू शकतात.COAI ने एक संस्था म्हणून काम करावं आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला जाब विचारण्याऐवजी सदस्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर करायला सांगायला हवं, असंही ‘जिओ’चं म्हणणं आहे.

शिवसेनेचा नरमाईचा सूर; नेमकं काय म्हणाले राऊत? UNCUT पत्रकार परिषद