हायलाइट्स:
- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल.
- छातीत दुखण्याच्या तक्रारीनंतर केले दाखल.
- महापौर कार्यालयाने दिली माहिती.
महापौर किशोरी पेडणेकर यांना काल रात्रीपासूनच त्रास होत होता. मात्र आज त्यांचा हा त्रास वाढल्यानंतर त्यांना परळमधील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या आवश्यक त्या चाचण्या करण्यात आल्या.
ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथ पेडणेकर यांच्यावर उपचार करत आहेत. पेडणेकर याची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.
क्लिक करा आणि वाचा- मुंबई पाऊस Live: नालासोपाऱ्यात ४ वर्षांचा मुलगा वाहून गेला, शोध सुरू
क्लिक करा आणि वाचा- रेल्वे रुळ ओलांडताना वयोवृद्ध व्यक्ती ट्रेन खाली आली आणि…