Home ताज्या बातम्या mahad landslide महाड दुर्घटना: तळीयेतील रहिवाशांसाठी शरद पवार यांची ‘ही’ महत्वाची सूचना

mahad landslide महाड दुर्घटना: तळीयेतील रहिवाशांसाठी शरद पवार यांची ‘ही’ महत्वाची सूचना

0
mahad landslide महाड दुर्घटना: तळीयेतील रहिवाशांसाठी शरद पवार यांची ‘ही’ महत्वाची सूचना

हायलाइट्स:

  • दरड कोसळून बाधित झालेल्या या तळीये गाव संपूर्ण वसवण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड.
  • ही सूचना शरद पवार यांनी केल्याची जितेंद्र आव्हाड यांची माहिती.
  • आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड तालुक्यातील कळीये गावचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड तालुक्यातील कळीये गावचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी सर्व पीडित नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर आता राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तळीये गावासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. दरड कोसळून बाधित झालेल्या या तळीये गाव संपूर्ण वसवण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत ही घोषणा केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जो शब्द दिला की कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती.’

क्लिक करा आणि वाचा- खेड दुर्घटना: पोसरेत मदतकार्य युद्धपातळीवर, ४ मृतदेह काढले बाहेर

मात्र, तळीये गावचं पुनर्वसन नेमके कोणत्या ठिकाणी करायचे हे अद्याप ठरलेले नाही. तळीये गावच्या रहिवाशांना मुख्यमंत्र्यांनी पुनर्वनसनाचे आश्वासन दिले आहे. शासन तळीयेकराच्या मागे उभे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अजूनही तिथे अनेक घरे धोकादायत स्थितीच आहेत. अशा लोकांना सुरक्षित स्थळी वसवणे अत्यंत आवश्यक आहे, असे आव्हाड म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- महाडमध्ये पावसाचा कहर सुरूच; हिरकणीवाडीत दरड कोसळली

क्लिक करा आणि वाचा- पुन्हा दरडीचा धोका! तुंग किल्ल्याच्या पायथ्यापाशी जमिनीला ३०० मीटरची भेग

या गावच्या रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्याची ही आता सुरुवात असून त्याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झालेली आहे. येथील नागरिकांना म्हाडाने घरे बांधून द्यावीत अशी सूचना शरद पवार यांनी केली. त्यानंतर म्हाडातर्फे बाधित लोकांना घरे बांधून देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. या प्रयत्नांमधूनच तेथे कोकणातले एक छान टुमदार गाव उभे राहील आणि ते काम म्हाडा करेल, असे आव्हाड पुढे म्हणाले.

Source link