हैदराबादः करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील स्थिती बिकट बनली आहे. महाराष्ट्रातील करोनाच्या व्हेरियंटमुळे (
maharashtra covid 19 variant ) दोन तेलुगु भाषिक राज्यांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातील करोनाचा डबल म्युटंटचे B.1.617 दोन तेलुगु भाषिक राज्यांमध्ये ५० ते ६० टक्के रुग्ण आढळून आलेत. एवढचं नव्हे तर केरळ आणि कर्नाटकातही हा व्हेरियंट रुग्णवाढीसाठी कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
करोनाच्या B.1.36 (N440K) या व्हेरियंटचे तेलंगण आणि आंध्र प्रदेशात फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णा आढळून आले. पण यानंतर तेलंगण आणि आंध्रात आलेल्या करोनाच्या आणखी दोन व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. एक आहे ब्रिटनचा नवीन स्ट्रेन B.1.1.7 आणि दुसरा डबल म्युटंट B.1.617 आहे. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीने (CCMB) ही माहिती दिली आहे. तर ब्रिटनचा स्ट्रेन B.1.1.7 चे पंजाब आणि केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. तर महाराष्ट्रात डबल म्युटंटमुळे प्रादुर्भाव वाढल्याचं सांगण्यात येतंय. ब्रिटनचा स्ट्रेन B.1.1.7 चे १० टक्के रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती ग्लोबल इनिशिएटीव्ह ऑन शेरींग एव्हीएन फ्लु डाटातून (GISAID)समोर आली आहे.
coronavirus : सावधान! देशात करोनाची तिसरी लाट येणार, शास्त्रज्ञांनी दिला इशारा
डबल म्युटंट B.1.617 असलेला करोनाचा हा व्हेरियंट दक्षिणेतील ५० टक्के रुग्णांमध्ये आढळून आला आहे. आंध्र प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटकात हा व्हेरियंट आढळून आला आहे. तर केरळमध्ये ब्रिटनमधील स्ट्रेनचे सर्वाधिक ३० टक्के रुग्ण आहेत, अशी माहिती CCMB च्या शास्त्रज्ञ दिव्या तेज सोपती यांनी दिल्ली.
लखनऊतील ऑक्सिजन प्लांटमध्ये भीषण स्फोट, ३ ठार तर ७ जखमी
महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट ही दक्षिणतेली ४ चार राज्यांच्या तुलनेत जवळपास दीड महिना आधीच सुरू झाली होती. ही लाट करोनाच्या B.1.617 व्हेरियंटमुळे आली, असं दिव्या तेज यांनी सांगितलं.
Source link