Home ताज्या बातम्या Maharashtra Flood: महाराष्ट्रावर संकट! राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

Maharashtra Flood: महाराष्ट्रावर संकट! राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

0
Maharashtra Flood: महाराष्ट्रावर संकट! राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

हायलाइट्स:

  • कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुराचं थैमान
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
  • पूरग्रस्तांना जमेल तितकी मदत करा – राज ठाकरे

मुंबई: मागील दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळं राज्यात पश्चिम महाराष्ट्र व कोकणात पूर आला आहे. गावेच्या गावे पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळं सुमारे ६० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारनं संपूर्ण यंत्रणा बचावकार्याला जुंपली असून स्वयंसेवी संस्था देखील मदकार्यात उतरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. (Raj Thackeray appeal mns workers amid flood situation in Maharashtra)

राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसैनिकांना आवाहन केलं आहे. ‘महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातही कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती भीषण आहे. ह्या अवघड परिस्थितीत मनसैनिकांनी पूरग्रस्तांना जमेल तितकी मदत करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

वाचा:महाराष्ट्रात पूर संकट! अजित पवारांची संरक्षणमंत्र्यांशी तातडीची चर्चा

‘आता लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. पूर जसजसा ओसरेल तसा रोगराईचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं संपूर्ण परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवा. योग्य त्या ठिकाणी आवश्यक ती मदत तातडीनं पोहोचेल याची काळजी घ्या. स्वत:चीही काळजी घ्या, पण महाराष्ट्रावरचं हे संकट मोठं आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये,’ असंही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना बजावलं आहे.

वाचा: संकटांची मालिका सुरूच! साताऱ्यात दरड कोसळून १२ जणांचा मृत्यू

Source link