हायलाइट्स:
- खरं म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही दाखल झालेल्या याचिका या एनसीपी स्पॉन्सर्ड आहेत- देवेंद्र फडणवीस.
- मराठा आरक्षणाला विरोध करणारे तुमचे लोक आहेत- देवेंद्र फडणवीस.
- बैठका घेऊन काही लोकांना तुम्ही आरक्षणविरोधी याचिका टाकायला लावलेल्या आहेत- देवेंद्र फडणवीस.
फडणवीस म्हणाले की, ‘खरं म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही दाखल झालेल्या याचिका या एनसीपी स्पॉन्सर्ड आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणारे तुमचे लोक आहेत. मी त्याही वेळेस सांगितलं होतं. काही लोकांची वक्तव्ये देखील आहेत आणि तुम्ही त्यांच्यासोबत बैठकाही घेतल्या आहेत. बैठका घेऊन त्यांना तुम्ही याचिका टाकायला लावलेल्या आहेत, असा थेट आरोप करतानाच नवाब मलिक यांना खोटं बोलण्याचा रोग जडला आहे, असे टीकास्त्रही फडणवीस यांनी सोडले आहे.
क्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षणः आता राज्य पातळीवर निर्णय घ्या; पवारांनी मांडला प्रस्ताव
नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र
जेव्हापासून नवाब मलिक यांच्या घरातील लोकांवर एनसीबीने कारवाई केली तेव्हापासून केंद्र सरकारविरोधात आणि भाजप विरोधात बेजबाबदार वक्तव्यं करण्याचा त्यांना नाद जडला असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
‘आम्ही मराठा आरक्षण टिकवून दाखवलं’
या सरकारला माझी आठवण आरक्षणावर स्थगिती आल्यानंतर आली. स्थगिती यायच्या आधीच्या एकाही बैठकीला मला बोलावलेलं नाही. हे सरकार विरोधकांशी चर्चा करणं कमीपणाचं मानतं. करोना असो की मग मराठा आरक्षण असो, ज्या वेळेस स्थगिती मिळाली आणि मग चारही बाजूंनी टीका झाली त्यानंतर सरकारने मला चर्चेला बोलावलं. पण मला चर्चेला बोलवा अथवा बोलवू नका. हा माझ्या सन्मानाचा विषय नाही. मराठा आरक्षण टिकलं पाहिजे हा माझा प्रयत्न होता आणि आमच्या सरकारने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवून दाखवलं.
क्लिक करा आणि वाचा- ‘फडणवीस मराठा आरक्षणाच्या विरोधात; भाजप डबल गेम खेळतोय’
‘मराठा समाजातील लाभार्थींना आमच्यामुळेच संरक्षण’
९ सप्टेंबर २०२० पर्यंत ज्या लोकांनी नोकरीचा किंवा शिक्षणातील सवलतींचा फायदा घेतला आहे अशांना संरक्षण देखील मिळालेलं आहे. हे आमच्या कायद्यामुळेच मिळालेलं आहे. आम्ही कायदा टिकवला, तुम्ही तो टिकवू शकलेला नाही असे सांगतानाच खोटं बोलू नका, असं आवाहनही फडणवीस यांनी केलं आहे.
क्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील म्हणतात…