हायलाइट्स:
- मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्य सरकारवर चौफेर टीका.
- समरजितसिंह घाटगे यांनी विचारला खरमरीत सवाल.
- राज्य सरकारला याची जबर किंमत मोजावी लागेल!
वाचा: मराठा आरक्षण रद्द : राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला गंभीर आरोप
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सामाजिक आणि आर्थिक मागास असल्याच्या निकषावर मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आले होते. अपघाताने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारला हे आरक्षण टिकवायचे होते. मात्र, न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यात सरकारला सातत्याने अपयश आले आहे. एकवेळ तरी सुनावणीच्या वेळी राज्य सरकारमार्फत चांगले वकीलही उपस्थित नव्हते परिणामी सुनावणी पुढे गेली होती. मराठा समाज ही बाब अद्याप विसरलेला नाही. या सरकारला मराठा आरक्षणाबाबत गांभीर्य नाही किंबहुना त्यासाठी त्यांचेकडून आवश्यक ते प्रयत्नही झालेले नाहीत, असे नमूद करत मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार इतके उदासीन का?, असा सवाल घाटगे यांनी केला.
वाचा: ‘राज्यात मराठा मुख्यमंत्री असता तर हा निर्णय अपेक्षित नसता’; राणेंच्या वक्तव्याने खळबळ
राज्य सरकारचा खेळ होत असला तरी यामध्ये मराठा समाजाचा जीव जात आहे. याचा मोठा फटका या समाजास बसणार आहे. मराठा समाजातील तरुण आरक्षणाच्या आधारे नोकरीसह शैक्षणिक लाभाकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसले आहेत. त्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. याला सर्वस्वी राज्य सरकारची अकार्यक्षमताच कारणीभूत आहे, असा आरोपही घाटगे यांनी केला. आता कोविडचा उद्रेक सुरू आहे. त्यामुळे यावर शांत राहणे हा एकच पर्याय आहे पण भविष्यात कोविड संपताच आपल्या न्याय मागणीसाठी सरकार विरोधात मराठा समाजास रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय असणार नाही, असा इशाराही घाटगे यांनी दिला.
वाचा: मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील म्हणतात…