Home बातम्या आंतरराष्ट्रीय Mexico Metro पाहा: मेट्रो रेल्वेसह पूल कोसळला; २३ ठार, ७० हून अधिक जखमी

Mexico Metro पाहा: मेट्रो रेल्वेसह पूल कोसळला; २३ ठार, ७० हून अधिक जखमी

0
Mexico Metro पाहा: मेट्रो रेल्वेसह पूल कोसळला; २३ ठार, ७० हून अधिक जखमी

[ad_1]

हायलाइट्स:

  • मेक्सिको सिटीमध्ये मेट्रो रेल्वेसह पूल कोसळला
  • भीषण अपघतात २३ ठार, ७० हून अधिक जखमी
  • अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

मेक्सिको सिटी: मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये सोमवारी रात्री मोठा अपघात झाला. मेट्रो रेल्वेसह पूल कोसळल्याने २३ जण ठार झाले. तर, ७० हून अधिक जखमी झाले. मेट्रो मार्गाच्या खाली असलेल्या रस्त्यांवरुन वाहनांची वर्दळ होती. अचानकपणे मेट्रो मार्ग कोसळल्याने वाहने ढिगाऱ्याखाली अडकली. ही दुर्देवी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मेक्सिको सिटीच्या महापौर क्लॉडिया शीनबॉम यांनी या अपघातात २३ जण ठार झाले असल्याचे म्हटले. तर, अधिकाऱ्यांनी ७० हून अधिक जण जखमी झाले असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. अपघात झाल्यानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. मेट्रो मार्गाच्या पुलाच्या ढिगाऱ्याखाली कार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एक कार ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याचीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मंगळवारी पहाटेपर्यंत ढिगारा काढण्याचे काम सुरू होते. याकामी मोठ्या क्रेनचीही मदत घेतली गेली आहे.

वाचा:करोना हिरावतोय कुटुंबाचा आनंद; ब्राझीलमध्ये ८०० गरोदर महिलांचा मृत्यू

वाचा: पवित्र ज्वालामुखीवर पॉर्न व्हिडिओचे चित्रीकरण; रशियन मॉडेलच्या कृत्याने खळबळ

वाचा:करोनावर मात केलेल्यांना लशीचा एकच डोस पुरेसा? संशोधनात नवा खुलासा

वाचा: अब्जाधीश बिल गेट्स आणि मेलिंडा घटस्फोट घेणार; सहमतीने निर्णय घेतल्याची माहिती

या मेट्रो मार्गाचे बांधकाम सध्याचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो एबरार्ड हे मेक्सिको सिटीचे महापौर असताना झाले होते. एबरार्ड यांनी ही अतिशय दु:खद घटना असल्याचे म्हटले. मागच्या वर्षीदेखील मेट्रोचा भीषण अपघात झाला होता. ताकुबया स्थानकावर दोन मेट्रो रेल्वेमध्ये झालेल्या अपघातात ४१ जण ठार झाले होते. तर, वर्ष २०१५ मध्ये एक रेल्वे नियोजित स्थानकावर न थांबता ओशियाना स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेला धडकली. या अपघातात १२ जखमी झाले होते.

[ad_2]

Source link