या ट्रेलरची सुरुवात पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन आणि सई ताम्हणकर यांच्यासोबत एका कारमध्ये होते. पंकज त्रिपाठी आई आणि मुलाच्या नात्याबद्दल बोलताना दिसतात. या चित्रपटात क्रिती सेनॉन एका डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. एका परदेशी दाम्पत्याला क्रिती आवडते आणि ते तिला सरोगेट मदर होण्यासाठी विनंती करतात. ज्याच्या बदल्यात ते तिला २० लाख देण्यास तयार होतात. क्रिती सुरुवातीला नाही म्हणते पण नंतर तयार होते. मस्ती मस्करीच्या नंतर ट्वीस्ट तेव्हा येतो जेव्हा अखेर ते दाम्पत्य मुल नको असल्याचं सांगतात.
कृती सेननं तिच्या सोशल मीडियावर हा ट्रेलर शेअर करताना दिसताना लिहिलं, ‘हा अनपेक्षित प्रवास वगळता मिमीला सर्व गोष्टींच्या अपेक्षा आहेत. ही माझी मिमी, तुमच्यासाठी आपल्या कुटुंबासोबत पाहा याची झलक.’
क्रिती सेनॉनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक, मनोज पाहवा, सई ताम्हणकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटासाठी क्रितीनं १५ किलो वजन वाढवलं होतं. अर्थात यासाठी तिला बरीच मेहनत घ्यावी लागली होती. ‘मिमी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. हा चित्रपट येत्या ३० जुलै रोजी नेटफ्लिक्स आणि जियो सिनेमावर रिलीज होणार आहे.
- Advertisement -

























WhatsApp