हायलाइट्स:
- मुंबईत साकीनाका येथे मायलेकाने केली आत्महत्या.
- शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल.
- मे महिन्यात करोना संसर्गामुळे झाले होते पतीचे निधन.
वाचा: धक्कादायक: BMCच्या राजावाडी रुग्णालयात उंदराने कुरतडले रुग्णाचे डोळे
साकीनाक्याच्या नाहर अमृत शक्ती येथील तुलिपिया अपार्टमेंटमध्ये रेश्मा या मुलासोबत राहत होत्या. मे महिन्यात रेश्मा यांच्या पतीचा करोना संसर्गाने मृत्यू झाला. त्यामुळे रेश्मा प्रचंड नैराश्यात होत्या. आज रात्री रेश्मा आणि त्यांच्या मुलाने इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही माहिती समजताच साकीनाका पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी त्या दोघांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
वाचा: पंढरपुरात १७ ते २५ जुलैपर्यंत संचारबंदी?; आषाढी यात्रेआधी मोठा निर्णय
साकिनाका पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली. यामध्ये रेश्मा यांनी आत्महत्येमागील कारण लिहिले आहेत. रेश्मा या राहत असलेल्या फ्लॅटच्या खालील मजल्यावरील फ्लॅटमध्ये अयुब खान, शेहनाज खान आणि शादाब खान हे राहतात. त्यांच्या वावरण्याचा आम्हाला त्रास होतो. हे कुटुंब वारंवार सोसायटी आणि पोलिसांकडे तक्रार करतं. यामुळे मानसिक त्रास झाल्याने जीवन संपवत असल्याचे रेश्मा यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. यावरून गुन्हा दाखल करून साकीनाका पोलिसांनी शादाब याला अटक केली आहे.
वाचा: जळगावात डेल्टा प्लसचा शिरकाव; जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आवाहन