Home शहरे मुंबई Mumbai Train Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, राजेंद्रनगर एलटीटी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

Mumbai Train Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, राजेंद्रनगर एलटीटी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

ठाणे : मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी (4 जुलै) विस्कळीत झाली आहे. कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे. कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून महिला, विद्यार्थी एकातासापेक्षा अधिक वेळ झाला असला तरी स्थानकात अडकून पडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्रनगर एलटीटी एक्स्प्रेसचे इंजिन ठाकुर्ली दरम्यान बंद पडले असून ब्रेक जॅम झाले आहेत. त्यामुळे जलद अपची वाहतूक धीम्या अपवर वळवण्यात आली आहे. 10 वाजून 50 मि. ही घटना घडली असून त्या गाडी मागे दोन लोकल रखडल्या होत्या. त्यातील प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून चालत ठाकुर्ली स्थानक गाठले. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे.