
मुंबई- बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक मानले जाणारे ज्येष्ठ अभिनेता
नसीरुद्दीन शाह यांची तब्येत फारशी चांगली नाही. दोन दिवसांपूर्वी नसीरुद्दीन शाह यांना मुंबईतील इस्पितळात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नसीरुद्दीन यांना
निमोनिया झाला आहे. इतर तपासण्यांनंतर त्यांच्या फुफ्फुसात काही ठिपकेही आढळले. नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत पत्नी रत्ना पाठक आणि त्यांची मुलंही इस्पितळात उपस्थित असतात.
नसीरुद्दीन शाह यांची तब्येत ठीक नसल्याचं याआधीही अनेकदा वृत्त समोर आले होते. परंतू यात तथ्य नसल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र यावेळी तसे झाले नाही. नसीरुद्दीन शाह यांच्या मॅनेजरने ‘बॉम्बे टाइम्स’ ला अभिनेत्याला इस्पितळात दाखल केल्याची बातमी खरी असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, ‘दोन दिवसांपासून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार होत आहेत. न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या फुफ्फुसात एक ठिपका आढळून आला आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि उपचार अजूनही सुरू आहेत.’
७० वर्षीय नसीरुद्दीन शाह यांनी १९७५ मध्ये ‘निशांत’ सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर नसीर यांनी १०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. करोना काळात सीमा पहावा दिग्दर्शित ‘राम प्रसाद की तेरहवी’ हा त्यांनी केलेला अखेरचा सिनेमा आहे.
Source link