हायलाइट्स:
- केंद्रातील मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांत अनेक स्वप्ने दाखवली, मात्र त्यातील एकही पूर्ण झालेले नाही, असा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीकास्त्र सोडले आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी करोनाची स्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही मलिक यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत ही टीका केली आहे. गेल्या ७ वर्षांच्या काळात महागाई कमी झालेली नाही. पेट्रोलचे दर देखील कमी झालेले नाहीत. लोकांच्या खात्यावर १५ लाख रुपये आलेले नाहीत, असे टोले लगावतानाच दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे जाहीर केलेले असताना देखील कोणालाही रोजगार मिळू शकलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या स्वप्नांपैकी एकही स्वप्न पूर्ण झालेले नसल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी करोनाची स्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही मलिक यांनी केली. पंतप्रधान मोदी यांना वेळेत निर्णय घेताच आले नाहीत. याच कारणामुळे देशातील कोट्यवधी लोकांना करोना विषाणूची लागण झाली. तसेच मोदींनी योग्य निर्णय न घेतल्यानेच लाखो लोकांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले, असेही मलिक पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- …तर निर्बंध अधिक कडक करावे लागतील; मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा
करोनामुळे देशातील कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला असून असंख्य लोकांना अर्ध्याच पगारावर काम करावे लागले. देशाची अर्थव्यवस्था ढासळली, हेच मोदी सरकारचे नाकर्तेपण आहे, असे मलिक पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- अजित पवार यांनी रामदास आठवले यांना केली ‘ही’ विनंती, म्हणाले…
गेल्या ७ वर्षांचा कालावधी पाहिला असता या काळात देशात बेरोजागारी वाढली आहे. या देशातील गरीब हा गरीबच राहिला. महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढली, असे सांगतानाच सात वर्षांच्या काळत देशातील सर्वसामान्य लोकांच्या जीवनात कोणताही बदल झाला नाही, अशा शब्दात मलिक यांनी भाजप, केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला.
क्लिक करा आणि वाचा- मेट्रोच्या चाचणीला हिरवा झेंडा, भाजपकडून मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शने