Home ताज्या बातम्या ncp on obc reservation: ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत राष्ट्रवादीने मांडली भूमिका; मलिक म्हणाले…

ncp on obc reservation: ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत राष्ट्रवादीने मांडली भूमिका; मलिक म्हणाले…

0
ncp on obc reservation: ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत राष्ट्रवादीने मांडली भूमिका; मलिक म्हणाले…

हायलाइट्स:

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीच मंडल आयोगाची अंमलबजावणी केली असून ओबीसी समजाचे आरक्षण आबाधित राहिले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मत आहे- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक.
  • मराठा आरक्षणाबाबतही आमचे मत स्पष्टच असल्याचे ते म्हणाले.
  • पदोन्नतीतील आरक्षणामध्ये कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशीच पक्षाची भूमिका असून त्यावरही चर्चा झाल्याचे ते म्हणाले.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीच मंडल आयोगाची अंमलबजावणी केली असून ओबीसी समाजाचे आरक्षण आबाधित राहिले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. या बरोबरच मराठा आरक्षणाबाबतही आमचे मत स्पष्टच असल्याचे ते म्हणाले. (ncp spokesperson nawab malik clarifys th stand of ncp on obc reservation)

नवाब मलिक मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही कायदा केला. भाजपचे सरकार सत्तेत आले तेव्हा देखील कायदा करण्यात आला. पण हा कायदा कोर्टाने रद्दबातल ठरवला. असे असले तरी मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी आम्ही सकारात्मक आहोत असे मलिक म्हणाले. या प्रकरणाकडे विशेष लक्ष द्या असे आदेश शरद पवार यांनीही दिल्याचे मलिक यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

पदोन्नतीती आरक्षणावरही केले भाष्य

पदोन्नतीतील आरक्षणावरही मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पदोन्नतीतील आरक्षणामध्ये कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही अशीच पक्षाची भूमिका असून त्यावरही चर्चा झाल्याचे ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- भाजपची समांतर चाल? मराठा आंदोलनाचे नेतृत्व विखे पाटलांकडे

‘महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही’

महाविकास आघाडी सरकार ५ वर्षांचा कार्यकाल नक्कीच पूर्ण करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलेच आहे की, आम्ही २५ वर्षांसाठी एकत्र आलेलो आहोत. भाजपने कितीही दावे केले तरी त्यांना यश मिळणार नाही, असे सांगतानाच जो पर्यंत तीन पक्ष एकत्र आहेत तो पर्यंत महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही, असे मलिक यांनी ठामपणे सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- अखेर बिबट्याचं अस्तित्व झालं सिद्ध; केली डुकराची शिकार, वन विभाग लावणार ट्रॅप
क्लिक करा आणि वाचा- अँटिलिया स्फोटके प्रकरण: पोलिस निरीक्षक सुनील माने पोलिस दलातून बडतर्फ

Source link