Home शहरे अमरावती NRC व CAA च्या विरोधातील ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण

NRC व CAA च्या विरोधातील ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण

0

 NRC व CAA च्या विरोधामध्ये आज भारत बंदची हाक देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर अमरावती येथे सुद्धा बहुजन क्रांती मोर्चासह विविध सामाजिक संघटना, मुस्लिम बांधवांच्या वतीने अमरावती बंद हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी इरविन चौक येथे हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष एकत्र आले होते. मात्र, या बंदच्या दरम्यान, रस्त्यावरील आंदोलन कर्त्यांची उभी असलेली वाहने पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता काही काळ पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये चांगला वाद निर्माण झाला होता. अखेर पोलिसांना हार मानावी लागली. व आपले वाहन घेऊन जावे लागेल. या आंदोलनामुळे इरविन चौकामध्ये वाहतुकीचा अडथळा निर्माण झालेला आहे. या बंदला व्यापाऱ्यांनी मात्र कमी प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.

अमरावती येथे NRC व CAA च्या विरोधामध्ये बंद पुकरण्यात आला असता, या बंदला हिंसक वळण लागले आहे. वाहन चालक हे मुख्य रस्त्याने जात असताना आंदोलनकर्त्यांनी त्यांची वाहने अडवून त्या वाहनावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या हिंसकवळणा विरोधात अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही. संध्य स्थितीमध्ये अमरावती शहरात तनावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.