हायलाइट्स:
- ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून दिल्ली हायकोर्टात याचिकेवर सुनावणी
- दिल्लीला कुठल्याही स्थिती ७०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश
- केंद्र सरकार इतके असंवेदशन कसे काय असू शकते? हायकोर्टाचा सवाल
ऑक्सिजन पुरवठ्याचे व्यवस्थापन IIT आणि IIM कडे द्या. ते तुमच्यापेक्षा उत्तम काम करतील. यात IIM च्या तज्ज्ञांना आणि बुद्धीवंतांचाही समावेश केला पाहिजे. दिल्लीतील मायाराम हॉस्पिटलकने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी कोर्टाने ही टिपणी केली.
महाराष्ट्रात ऑक्सिजनची मागणी आता कमी आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला करण्यात येणारा ऑक्सिजनचा पुरवठ्यात कपात करावी. ऑक्सिजन साठवता येऊ शकतो. यामुळे आपत्कालीन स्थिती नागरिकांचे प्राण वाचवण्यास मदत होईल, असं अॅमिक क्युरीकडून कोर्टात सांगण्यात आलं. यावरून कोर्टाने केंद्राला फटकारलं. दिल्लीला ७०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सांगितलं आहे. कुठल्याही परिस्थितीत हा पुरवठा झालाच पाहिजे, असं कोर्टाने म्हटलं.
coronavirus update : देशव्यापी लॉकडाउनसाठी केंद्रावर दबाव, बिहारमध्येही लॉकडाउन घोषित
दिल्ली हायकोर्टात गेल्या आठवड्यात शनिवारी झालेल्या सुनावणी कोर्टाने कडत शब्दांत ताशेरे ओढले होते. पाणी आता डोक्याच्या वर गेले आहे. आता आम्हाला कामाशी मतलब आहे. प्रत्येक गोष्टीची व्यवस्था केली पाहिजे. कुठल्याही स्थितीत दिल्ली ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला पाहिजे. असं न केल्यास कोर्टाच्या अवमानने प्रकरणी कारवाई केली जाईल, असं हायकोर्टाने बजावलं होतं.
वन्यप्राण्यांनाही संसर्ग! हैदराबादमधील ८ सिंह करोना पॉझिटिव्ह
दिल्लीत गेल्या २४ तासांत करोनाचे १८ हजार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. २०,२९३ जण करोनामुक्त झाले आहेत. तर ४४८ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. दिल्लीत ८९,५९२ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.