हायलाइट्स:
- जळगाव जिल्ह्यात करोनाच्या रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीमुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.
- त्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांनी पाठपुरावा करुन जळगाव जिल्ह्यासाठी २० मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनचा एक टँकर उपलब्ध झाला.
- आज बुधवारी दुपारी गुजरात राज्यातून हा टँकर जळगावात दाखल झाला. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची २४ तासांची गरज भासली आहे.
करोनाच्या रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीमुळे जळगाव जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांनी पाठपुरावा करुन जळगाव जिल्ह्यासाठी २० मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनचा एक टँकर उपलब्ध झाला. आज बुधवारी दुपारी गुजरात राज्यातून हा टँकर जळगावात दाखल झाला. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची २४ तासांची गरज भागली आहे. (due to the efforts of girish mahajan a tanker of 20 metric tons of oxygen reached in jalgaon)
जळगाव जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट तीव्र असल्याने रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेतली तर २४ तासात सुमारे ४० मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाला दिवसाआड एक लिक्विड ऑक्सिजनचा टँकर मिळत. आहे. यातून २४ तासांची गरज भासते. मात्र, सद्यस्थितीत लिक्विड ऑक्सिजनचा होणारा पुरवठा पुरेसा नाही. दररोज साधारणपणे ८ ते १०- मेट्रीक टन ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन भाजप नेते गिरीश महाजन यांनी जिल्ह्यासाठी २० मेट्रीक टन क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजनचा टँकर उपलब्ध करून दिला आहे. अखेर बुधवारी दुपारी हा टँकर जळगावात दाखल झाला.
क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज ५७ हजारांवर नवी रुग्णवाढ, ९२० मृत्यू
लिक्विड ऑक्सिजनचा टैंकर जळगावात आल्यानंतर तो एमआयडीसीतील हर्षिता गॅसेस या रिफिलिंग सेंटरवर खाली करण्यात आला. सध्या जिल्हा प्रशासनाकडून आरोग्य यंत्रणेसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज याठिकाणाहून भागवली जात आहे. दरम्यान, यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती विदारक आहे. त्यामुळे आम्ही जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यासाठी आठवड्यातून एकदा २० मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. लिक्विड ऑक्सिजन आम्ही प्रशासनाला विनामूल्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा- मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान, राष्ट्रपतींना पत्र लिहिणार: मुख्यमंत्री
क्लिक करा आणि वाचा- देवेंद्र फडणवीसांनी खोटे बोलून मराठा समाजाची फसवणूक केली: नाना पटोले