हायलाइट्स:
- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी.
- कोविड स्थितीमुळे सर्व नियमांचे पालन करण्याचे निर्देश.
- निकालानंतर मिरवणूक काढण्यास करण्यात आली आहे मनाई.
पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. येथे महाविकास आघाडीकडून भालके यांचे पुत्र भगीरथ भालके नशीब आजमावत आहेत तर भाजपकडून समाधान अवताडे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. या दोघांतच मुख्य लढत होती असे चित्र पाहायला मिळाले होते. ही निवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप दोघांसाठीही प्रतिष्ठेची आहे.
पंढरपूरच्या मतमोजणीचे क्षणाक्षणाचे अपडेट्स येथे जाणून घ्या…
– पोटनिवडणुकीत ५२४ मतदान केंद्रावर २ लाख ३४ हजार मतदारांनी बजावला आहे मतदानाचा हक्क.
– मतमोजणी केंद्राकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिगेटिंग लावून करण्यात आले आहेत बंद.
– शासकीय गोदामात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला होणार सुरुवात.