कश्मीर मध्ये थंडीचा कहर कायम असून जगप्रसिद्ध दल सरोवर आणि अन्य सरोवरांचे पाणी गोठले आहे
हवामान विभागाने सांगितले की,किमान तापमान गोठनबिंदूच्याही खाली नोंदवले गेले आहे.
येथे किमान तापमान सामान्य तापमानाच्या मानाने काही डिग्री सेल्सिअस तापमान घसरले आणि दररोज जम्मूतील रहिवासी कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहेत.
श्रीनगरमधील तापमान 0 ते 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. रात्रीच्या तापमानात बदल झाल्याने दल सरोवर अन्य सरोवरांचे काही भाग गोठले आहेत, पाणीपुरवठ्यावर याचा जास्त परिणाम जाणवत आहे.
दल सरोवर गोठल्याने होडी चालकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
कश्मीर खोऱ्यात देखील कडाक्याची थंडीने जनजीवन विस्कळीत झाले आहे.