Photos- मंदिरा बेदीला आठवली लग्नाची २३ वर्ष, राज कौशलशिवायचा प्रत्येक क्षण वाटतोय दशक

Photos- मंदिरा बेदीला आठवली लग्नाची २३ वर्ष, राज कौशलशिवायचा प्रत्येक क्षण वाटतोय दशक
- Advertisement -


हायलाइट्स:

  • राज यांच्या आठवणीने मंदिरा भावुक
  • मंदिरा आणि राज यांच्या लग्नाला २३ वर्ष पूर्ण
  • फोटो पोस्ट करत पतीला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई– अभिनेत्री मंदिरा बेदी हिच्या पतीचं राज कौशल याचं नुकतंच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पतीच्या अचानक निघून जाण्याने मंदिरा पूर्णपणे कोलमडून गेली. त्या परिस्थितीतही राज कौशल यांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी मंदिराने दाखवलेल्या धैर्याचं चाहत्यांनी कौतुक केलं. मंदिरा आणि राज यांच्या लग्नाला २३ वर्ष पूर्ण झाली आहेत. राज यांच्या मृत्यूनंतर मंदिराला आता लग्नाची २३ वर्ष आणि एकमेकांना ओळखण्याची २५ वर्ष आठवत आहेत. याचमुळे मंदिराने काही फोटो पोस्ट करत राज यांच्या आठवणींना उजाळा दिला.

‘एकाच माणसाकडून दोनदा’ मीरानं सांगितला धक्कादायक अनुभव


मंदिराने इन्स्टाग्रामवर राजसोबतचे फोटो पोस्ट करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टसोबत एक भावुक कॅप्शन देत मंदिराने तिच्या भावना मोकळ्या केल्या. मंदिराने लिहिलं, ‘एकमेकांना जाणून घेण्यासाठी २५ वर्ष आणि आपल्या लग्नाला २३ वर्ष, सर्व अडीअडचणींचा सामना करत, प्रत्येक संकटाला तोंड देत, प्रत्येक यश- अपयश पचवत.’ मंदिराच्या या पोस्टवर अभिनेत्री मौनी रॉयने प्रतिक्रिया देत तिच्याप्रती प्रेम व्यक्त केलं आहे. यासोबत अनेक कलाकारांनीही मंदिराची हिम्मत वाढवणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


मंदिरा आणि राज यांना भेटून २५ वर्ष झाली आहेत तर यांच्या नात्याला २३ वर्ष पूर्ण झाली आहेत. मंदिरा आणि राज यांनी १९९९ साली लग्नगाठ बांधली होती. त्यांना एक मुलगाही आहे. त्यानंतर मंदिरा आणि राज यांनी २०२० साली एका मुलीला दत्तक घेतलं होतं. ३० जून रोजी राज यांना हृदयविकाराचा त्रीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर BMC आधी मनसेने चिकटवलं पोस्टर





Source link

- Advertisement -