Home गुन्हा Pimpri : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणा-या चौघांवर गुन्हा

Pimpri : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणा-या चौघांवर गुन्हा

0

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याबाबत चोघांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सुधाकर विश्वनाथ वारभुवन (वय 59, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नितीन घोलप, बाळासाहेब शिंदे, दिनकर तेलंग, कैलास कांबळे या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे आक्षेपाह फोटो आणि अश्लील मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला. बदनामीकारक पोस्ट करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत सुधाकर यांनी पिंपरी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार सोशल मीडियावर पोस्ट टाकणा-या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.