हायलाइट्स:
- राज कुंद्राला समोर पाहिल्यानंतर शिल्पा प्रचंड संतापली
- राजच्या वर्तणुकीमुळे कुटुंबाची बदनामी केल्याचा शिल्पाने केला आरोप
- संताप व्यक्त केल्यानंतरही शिल्पाने राज कुंद्राचा केला बचाव
राजला पाहून शिल्पाचा संयमाचा बांध फुटला
पॉर्नोग्राफी प्रकरणी राजच्या पोलीस कोठडीत २३ जुलैपर्यंत न्यायालयाने वाढ केली होती. त्यानंतर याप्रकरणी तपास करणाऱ्या मुंबई क्राईम ब्राँचच्या अधिकाऱ्यांनी राजला त्याच्या जुहू येथील घरी नेले. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पाला मोठा धक्का बसला होता. ती मानसिकरित्या कोलमडून गेली आहे. राजबद्दल तिच्या मनात प्रचंड संताप, तिरस्कार निर्माण झालेला.
‘शिल्पा शेट्टीची चूक नसेल तर ती पतीच्या विरोधात बोलण्याची हिंमत करेल’
हा सगळा संताप, तिरस्कार राजला समोर पाहिल्यानंतर बाहेर पडला आणि तिने राजला विचारले हे सगळे तू का केलेस? तुझ्या अशा वागण्यामुळे अनेक महत्त्वाची बिझनेस डिल हातातून गेलीच याशिवाय कुटुंबाची मोठी बदनामी झाली.’ संतापलेल्या शिल्पाला राज समजावण्याचा प्रयत्न करत होता आणि याप्रकरणी तो निरपराध आहे हे तिला तो पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी राजने पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा सांगितले की, तो पॉर्न फिल्म नाही तर इरॉटिक फिल्म बनवायचा.
तरी देखील शिल्पाने राजची बाजू घेतली
शिल्पा आणि राजची चौकशी होत होती तेव्हा शिल्पा खूपच संतप्त होती. परंतु त्यानंतरही तिने राजचीच बाजू घेतली. तिनेही पोलिसांना सांगितले की, राज पॉर्न फिल्म नाही तर इरॉटिक फिल्म बनवायचा. तसेच हॉटस्पॉट्स अॅपशी तिचे काहीही देणेघेणे नाही. तिने हे देखील पोलिसांना सांगितले की, पॉर्न फिल्म आणि इरॉटिक फिल्म वेगळे आहेत. अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मवरूनही प्रसारित होणारे अनेक कन्टेट हे अश्लिल असतात. त्यामुळे राजवर लावलेले आरोप योग्य नाहीत, असे सांगत तिने राजचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिसच चक्रावले! ज्या यश ठाकूरला होते शोधत तो निघाला अरविंद कुमार श्रीवास्तव
त्यानंतर तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी शिल्पाची तब्बल सहा तास चौकशी केली आणि तिचा जबाब नोंदवून घेतला. क्राईम ब्राँचच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘याप्रकरणामध्ये शिल्पा शेट्टीची काही भूमिका आहे, असे आता तरी वाटत नाही. अर्थात यानंतरही त्यांची चौकशी केली जाईल.’
राजला जेल की बेल आज निकाल लागणार
राज कुंद्राला पॉर्न फिल्म बनवल्याप्रकरणी आणि ते इंटरनेवर प्रसारित केल्याप्रकरणी १९ जुलै रोजी अटक झाली होती. त्यानंतर त्याला २३ जुलैला न्यायालयात हजर केले असता त्याला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या दरम्यान राजची तपास अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली. या तपासावेळी पोलिसांच्या एक गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे, फेब्रुवारीमध्ये या पॉर्न रॅकेटचा पर्दाफाश झाला त्याच काळात राजने त्याचा फोन बदलला होता. राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थॉर्पे हे दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत.
राज कुंद्राच्या ऑफिसमध्ये पोलिसांना सापडलंय गुप्त कपाट, अनेक खुलासे होण्याची शक्यता