pornography case: राज कुंद्राच्या जामिनावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात निर्णय!

pornography case:  राज कुंद्राच्या जामिनावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात निर्णय!
- Advertisement -


हायलाइट्स:

  • जामिन मिळावा यासाठी राज कुंद्राचा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज
  • राजच्या अर्जावर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी
  • पोर्नोग्राफी प्रकरणी राज मंगळवारपासून मुंबई पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लिल व्हिडिओ बनवणे आणि ते इंटरनेटवर अपलोड केल्या प्रकरणी अटक झाली आहे. राजला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परंतु राजची अटक बेकायदा असल्याचे सांगत त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यावर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला २० जुलै रोजी अटक झाली होती. त्यानंतर त्याला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. ही मुदत संपल्यानंतर शुक्रवारी, त्याला न्यायालायत हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला पुन्हा २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालायने दिले. न्यायालायने हे आदेश दिल्यानंतर राजचे वकील सुभाष जाधव यांनी त्याला झालेली अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितलं.

सुभाष म्हणाले की, ‘त्याने कोणत्याही प्रकारचे पॉर्न व्हिडिओ तयार केलेले नाहीत. जे व्हिडिओ त्याने केले आहेत, ते पॉर्न या कॅटेगरीत येत नाहीत.’ त्यांनी पुढे असेही सांगितले की, राजच्या विरोधात पोलिसांनी चार हजार पानांची चार्जशिट फाईल केली आहे. परंतु त्यामध्ये सेक्शन ६७ ए अंतर्गंत पॉर्न व्हिडिओ तयार केले आहेत, असे कुठेही म्हटलेले नाही. राज कुंद्रावर जे आरोप ठेवले आहेत ते जामिनपात्र आहेत. आईपीसी अंतर्गंत कलम ४२० (फसवणूक), कलम ३४ (कॉमन इंटेशन), कलम २९२,२९३ (अश्लिलतेचा प्रसार करणे) आणि आयटी कायद्यांतर्गंत गुन्हा नोंदवण्यात येऊन राज कुंद्राला २० जुलै रोजी अटक करण्यात आली होती.

दरम्यान, अश्लील आणि पॉर्न व्हिडिओंची निर्मिती प्रकरणी मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये गुन्हा दाखल करून घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. तेव्हा त्यांना पॉर्न फिल्म तयार करणा-या रॅकेटचा पर्दा फाश केला. त्यामध्ये केलेल्या तपासामध्ये सातत्याने राज कुंद्रा आणि त्याची वियान इंडस्ट्रीजचे नाव पुढे आले. त्यानंतर याची सखोल चौकशी करून राजच्या विरोधात पोलिसांनी सबळ पुरावे गोळा केले आणि मग राजला अटक केली.



Source link

- Advertisement -