Home ताज्या बातम्या prakash ambedkar: पक्षाच्या कार्यक्रमांपासून तीन महिने दूर राहणार; प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

prakash ambedkar: पक्षाच्या कार्यक्रमांपासून तीन महिने दूर राहणार; प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

0
prakash ambedkar: पक्षाच्या कार्यक्रमांपासून तीन महिने दूर राहणार; प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

मुंबई: व्यक्तिगत कारणांसाठी आपण पक्षाच्या कार्यक्रमांपासून पुढील तीन महिन्यांसाठी दूर राहणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या तीन महिन्यांच्या काळात पक्षाचे कार्यक्रम सुरू राहावेत यासाठी त्यांनी रेखा ठाकूर यांची पक्षाच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांनी रेखा ठाकूर यांना सहकार्य करून पक्षाचे कार्यक्रम राबवावेत, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे. फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. (Prakash Ambedkar will be away from party programs for three months for personal reasons)

मी माझ्या व्यक्तिगत कारणासाठी पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमातून तीन महिन्यासाठी कार्यरत राहणार नाही. पक्ष चालला पाहिजे. आपण आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्यातील ५ जिल्ह्यांमध्ये निवडणुका आहेत. म्हणून पक्षाला अध्यक्ष असणे महत्वाचे आहे, असे सांगत वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी प्रभारी म्हणून रेखा ठाकूर यांची नियुक्त करण्यात येत आहे, असे आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- गेल्या सहा महिन्यांत किती बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या?; नवाब मलिक म्हणतात…

डॉ. अरुण सावंत, वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र कमिटी, जिल्हा कमिटी आणि सर्व कार्यकर्त्यांनी प्रभारी अध्यक्ष रेखा ठाकूर यांना मदत करून पक्षाची विजयाच्या दिशेने वाटचाल करू या, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- सरपंच ते केंद्रीय मंत्री; पाहा, कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास!

वंचित बहुजन आघाडीने ५ जुलैला मुस्लिम आक्षणाचा मुद्दा हाती घेत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळी विधानभवनावर मोर्चा काढला होता. मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण दयावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने रझा अकादमीला सोबत घेत हे आंदोलन केले होते. यापुढे आता वंचित बहुजना आघाडीला राज्यातील ५ जिल्ह्यांमधील निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. अशात व्यक्तिगत कारणांसाठी आंबेडकर दूर राहत असल्याने पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये कोणताही खंड पडू नये यासाठी त्यांनी रेखा ठाकूर यांची अध्यक्षपदी प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- काँग्रेसला दे धक्का! ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांचा भाजपत प्रवेश

Source link