Home गुन्हा Pune : आंबेगाव बुद्रुक भिंत दुर्घटना प्रकरण : सिंहगड महाविद्यालयाच्या व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा दाखल

Pune : आंबेगाव बुद्रुक भिंत दुर्घटना प्रकरण : सिंहगड महाविद्यालयाच्या व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा दाखल

आंबेगाव बुद्रुक येथे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या परिसरातील झाड सीमाभिंतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झले आहेत. याप्रकरणी जागामालक, इमारत विकासक, ठेकेदार, सिंहगड महाविद्यालयाचे व्यवस्थापक व बांधकाम विभागाचे कामकाज पाहणारे अधिकारी यांच्याविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आज सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

आज सकाळी कामगार राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच मृत्यू पावलेल्या व्यक्ती छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील असून त्यांचे मृतदेह त्यांच्या गावी पाठविण्यात येत आहेत.

  • एनडीआरएफ आणि प्रशासन यांच्या वतीने बचाव कार्य पूर्ण केले. तसेच आंबेगाव दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. कोंढवा येथील दुर्घटनेनंतर आंबेगाव बुद्रुक भिंत दुर्घटना प्रकरणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष करून चालणार नाही, असे प्रतिक्रिया जन्मांसातून व्यक्त होत आहे.