Home गुन्हा Pune : टूर पॅकेजच्या नावाखाली महिलेची 40 हजार रुपयांना फसवणूक

Pune : टूर पॅकेजच्या नावाखाली महिलेची 40 हजार रुपयांना फसवणूक

0

पुणे-परवेज शेख
ऑनलाईन जाहिरातीच्या माध्यमातून टूर पॅकेज देण्याच्या नावाखाली महिलेची 40 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 1 मार्च ते 14 मार्च या दरम्यान घडली. याप्रकरणी एका अज्ञात मोबाईल व बँकेचे खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या म्हैसूर व उटी टूर्स पॅकेजसाठी शोधत असताना ऑनलाईन माध्यमातून त्यांनी एका टूर्स अण्ड ट्रॅव्हल्स कंपनीची जाहिरात पाहिली. जाहिरातीवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर त्यांनी फोन केला. यावेळी मी मॅनेजर बोलत असल्याचे सांगून पॅकेजची माहिती देऊन त्यांना बँक खात्यात वेळोवेळी 40 हजार रुपये भरावयास लावले.
मात्र कोणतेही टूर्सचे पॅकेज त्यांना मिळाले नाही. परिणामी त्यांनी सायबर सेलमध्ये धाव घेतली. त्यानुसार सायबर सेलकडून शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंहगड पोलीस पुढील तपास करीत आहेत.