Home शहरे पुणे Pune : नांदेड-शिवणेला जोडणारा पूल पाण्याखाली

Pune : नांदेड-शिवणेला जोडणारा पूल पाण्याखाली

0

 नांदेड आणि शिवणे या दोन गावांना जोडणारा मुठा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. यामुळे नागरिकांना वडगाव बुद्रुक, वारजे मार्गाने कित्येक किलोमीटर लांबून प्रवास करावा लागत आहे.

खडकवासला धरणातून केलेल्या विसर्गामुळे मुठा नदीला पूर आला. या पुरामध्ये नांदेड आणि शिवणे या दोन गावांना जोडणारा मुठा नदीवरील पूल पाण्यात गेला. पूल पाण्यात गेल्याने या मागावरील वाहतूक बंद झाली. या पुलाला पर्यायी पूल अथवा अन्य रस्ता जवळपास उपलब्ध नाही. नांदेड गावातील अनेक मुले शिवणे येथील शाळांमध्ये आहेत. तसेच नांदेड आणि शिवणे गावात ब-यापैकी लघुउद्योग असल्याने दोन्ही गावातील नागरिकांची या मार्गावरून वर्दळ असते.

पूल पाण्याखाली गेला असल्याने शिवणे आणि नांदेड गावातील लोकांना वारजे, वडगाव बुद्रुक या मार्गावरून काही किलोमीटरचा प्रवास करून जावे लागत आहे. यात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या मार्गावर नवीन पूल बांधण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.