हायलाइट्स:
- एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी कोठडीतच.
- न्यायालयाने दिली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी.
- चौधरी यांनी जामीन अर्जात केला गंभीर आरोप.
वाचा: डान्स बारला परवानगी कुणी दिली?; ‘या’ नेत्याचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
पुणे भोसरी एमआयडीसी येथील जमीन खरेदीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात गिरीश चौधरी यांना ६ जुलै रोजी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. तेव्हापासून चौधरी हे ईडी कोठडीत असून मंगळवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
मला बळीचा बकरा बनवले!
गिरीश चौधरी यांनी विशेष न्यायालयात मंगळवारी जामिनासाठी केलेल्या अर्जात गंभीर आरोप केला आहे. राजकीय षडयंत्रातून मला बळीचा बकरा बनवले गेले आहे, असा दावा त्यांनी आपल्या अर्जात केला आहे. अॅड. मोहन टेकावडे यांच्यामार्फत चौधरी यांनी हा अर्ज केला असून आपल्याविरोधात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) कारवाई होऊच शकत नाही, असेही त्यांनी अर्जात नमूद केले आहे.
वाचा: मुंबईत लसीकरणाला पुन्हा ब्रेक; लस तुटवड्यामुळे सतत होतेय कोंडी
ईडीने केला हा दावा
भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी चौकशीत कमिशन एजंट महेंद्र जैन याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. २०१७ ते २०१९ या दरम्यान चर्चगेट येथील पंकज महल येथे चौधरी यांना कागदपत्रे आपण दिली होती, असे जैनने म्हटले आहे. देवेश उपाध्याय याच्या सांगण्यावरून आपण हे केल्याचेही जैनने जबाबात म्हटले आहे. उपाध्याय हा बेंचमार्क बिल्डकॉनसाठी काम करत होता आणि याच फर्मने चौधरी यांना पुणे येथील जमीन खरेदी करण्यासाठी कर्जाची काही रक्कम दिली होती, असे तपासातून समोर आले आहे. जैन याने ओमप्रकाश शारदा यांचेही नाव घेतले आहे. ते या कंपनीचे व्यवस्थापक होते आणि त्यांनी हे कर्ज चौधरी यांना दिले होते. दरम्यान शारदा यांचे सप्टेंबर- ऑक्टोबर २०१६ या दरम्यान निधन झाले आणि हा जमीन व्यवहार एप्रिल २०१६ मधील आहे, असेही जैन याने जबाबात सांगितल्याचे ईडीने म्हटले आहे.
वाचा:राज ठाकरे यांना अखेर मास्क लावावा लागला!; नेमकं काय घडलं पाहा…