Home मनोरंजन Raj Kaushal : इथे वाचा मंदिरा बेदीचा नवरा राज कौशल यांच्याबद्दलच्या फारशा माहीत नसलेल्या गोष्टी

Raj Kaushal : इथे वाचा मंदिरा बेदीचा नवरा राज कौशल यांच्याबद्दलच्या फारशा माहीत नसलेल्या गोष्टी

0
Raj Kaushal : इथे वाचा मंदिरा बेदीचा नवरा राज कौशल यांच्याबद्दलच्या फारशा माहीत नसलेल्या गोष्टी

[ad_1]

हायलाइट्स:

  • राज कौशल यांना व्हायचे होते कमर्शिअल पायलट
  • गंमतीखातर जाहिरातीच्या क्षेत्रात सुरू केले काम
  • अनेक लोकप्रिय जाहिरातींसाठी केले स्क्रिप्ट लेखन

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता आणि अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे बुधवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. राज यांनी रविवारी आपल्या मित्रांसोबत पार्टी केली होती. सोमवारी राज यांनी मंदिरा आणि त्यांच्या मित्रांसोबत सोशल मीडियावर फोटो देखील शेअर केला होता. त्यामुळे अचानक त्यांच्या निधनाची बातमी आल्याने त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे.

पतीच्या जाण्याने तुटली मंदिरा बेदी, रोनित रॉयने दिला धीर

राज यांनी ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’, ‘एंथनी कौन है’ या सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. तसेच ‘माय ब्रदर निखिल’, ‘शादी का लड्डू’, ‘प्यार में कभी कभी’ या सिनेमांची निर्मिती देखील केली होती. १९९२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘बेखुदी’ सिनेमासाठी स्टंट दिग्दर्शनही केले होते.


राज यांना कमर्शिअल पायलट व्हायचे होते

राज यांचा जन्म मुंबईत झाला. पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांना एविएश इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचे होते. त्यांना कमर्शिअल पायलट व्हायचे होते. १९८९ मध्ये विज्ञान शाखेतून पदवी घेतल्यानंतर त्यांनी कॉपीरायटर म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांनी जाहिराती करणाऱ्या विविध एजन्सीसाठी लेखन करायलाही सुरुवात केली होती. जवळपास तीन वर्षे त्यांनी हे काम केले होते. त्यावेळी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते.

मंदिरा बेदीचे पती दिग्दर्शक राज कौशल यांचं हार्टअटॅकने निधन

मुकुल आनंदसोबत केले दिग्दर्शन

राज यांनी १९९२ ते ९६ या कालावधीत दिवंगत दिग्दर्शक मुकुल आनंद यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर राज यांनी सुभाष घई यांच्या ‘त्रिमूर्ती’ सिनेमासाठी देखील सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. १९९८ मध्ये राज यांनी स्वतःची जाहिरात एजन्सी सुरू केली. त्यांच्या एजन्सीने आतापर्यंत ८०० हून अधिक जाहिराती केल्या आहेत. त्यामध्ये ‘उषा’ पासून ‘मॅगी’ पर्यंत अनेक जाहिरातींचा समावेश आहे. याशिवाय ‘क्लोजअप’, ‘गोदरेज’, ‘महाराष्ट्र टुरिझम’ यांच्या जाहिरातींचाही समावेश आहे.


अशी झाली मंदिराशी भेट

राज कौशल आणि मंदिरा बेदी यांचे १९९९ मध्ये लव मॅरेज झाले. त्यानंतर २०११ मध्ये त्यांना वीर झाला. राज आणि मंदिरा यांची पहिली भेट १९९६ मध्ये झाली. त्यावेळी राज एका जाहिरात संस्थेमध्ये काम करायचे. त्यावेळी त्यांच्याकडे ‘फिलिप्स’ जाहिरातीसाठी त्यांना एका नवीन मुलगी हवी होती. त्यावेळी मंदिराला ‘शांती’ या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळवली होती. त्यांची पहिली भेट झाल्यानंतर राज आणि मंदिरामध्ये छान मैत्री झाली, त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमाचे नाते फुलले.

AssignmentImage-679302007-1625049344

१९९९ मध्ये राज यांनी दिग्दर्शक म्हणून केला प्रवेश

राज कौशल यांनी सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून १९९९ मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यांनी ‘प्यार में कबी कभी’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. असे सांगितले जाते की, या सिनेमातून अभिनेता, दिग्दर्शकासहित, संगीतकार अनेक क्रू मेंबर्सनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. २००४ मध्ये राज यांनी ‘शादी का लड्डू’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले. त्यानंतर त्यांनी २००६ मध्ये ‘एंथनी कौन है’ हा सिनेमा प्रदर्शित केला. बॉक्स ऑफिसवर हे तिन्ही सिनेमे फारसे चालले नाहीत.

आजही राज यांनी लिहिलेल्या ओळी लोकांच्या स्मरणात

स्क्रिप्ट रायटर म्हणूनही राज कौशल यांनी लोकप्रियता मिळवली होती. त्यांनी अनेक जाहिरातींसाठी आकर्षक ओळी लिहिल्या होत्या. त्यात ‘इस सिमेंट में जान है’, ‘देश की धडकन हीरो होंडा’ यांसारख्या आकर्षक ओळी राज यांनी लिहिल्या होत्या. राज यांनी जाहिराच्या क्षेत्रामध्ये खूप लोकप्रियता मिळवली होती. आजही त्यांची जाहिरात एजन्सी ही आघाडीची संस्था म्हणून ओळखली जाते.



[ad_2]

Source link