Raj Kaushal Passed Away: मंदिरा बेदीचे पती दिग्दर्शक राज कौशल यांचं हार्टअटॅकने निधन

Raj Kaushal Passed Away: मंदिरा बेदीचे पती दिग्दर्शक राज कौशल यांचं हार्टअटॅकने निधन
- Advertisement -


हायलाइट्स:

  • अभिनेत्री मंदिरा बेदीवर कोसळला दुःखाचा डोंगर रा
  • राज कौशल यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा
  • मंदिरा बेदीच्या पतीच्या हृदयविकारच्या धक्क्यानं झालं निधन

मुंबई– अभिनेत्री मंदिरा बेदी चे पती राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सकाळी ४.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ४९ वर्षांचे होते. मंदिरा बेदी आणि राज कौशल यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. १९९९ मध्ये मंदिरा आणि राज यांचे लग्न झाले होते. रविवारी राज आणि मंदिरा यांनी मित्र- मैत्रिणींसाठी त्यांच्या घरीच पार्टी ठेवली होती.

या पार्टीत अंगद बेदी, नेही धुपिया, सागरिका घाडगे, झहिर खान, आशिष चौधरी आणि त्याची पत्नी उपस्थित होते. राज यांनी रविवारी रात्री मित्रांसोबत पार्टी केली. त्यानंतर सोमवारी सोशल मीडियावर मंदिरासोबतचा फोटो शेअर करत त्यांचा दिवस चांगला गेल्याचं सांगितलं होतं. ही दुःखद बातमी समजल्यानंतर मंदिराच्या घरी सर्वात आधी आशिष चौधरी पोहोचला.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी राज कौशल यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राज कौशल यांच्या कुटुंबाचा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, ‘मंदिरा बेदी यांचे पती आणि अ‍ॅड फिल्ममेकर राज कौशल यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या बातमीने आम्ही सारेच धक्क्यात आहोत.’


मंदिरा बेदीचे पती राज कौशल हे एक दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांनी ‘प्यार में कभी-कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. याशिवाय त्यांनी ‘माय ब्रदर निखिल’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘प्यार में कभी-कभी’ या चित्रपटांची निर्मिती देखील केली होती.

मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचं लवमॅरेज होतं. दिग्दर्शक मुकुल आनंद यांच्या घरी त्यांची पहिली भेट झाली. असे म्हटले जाते की मंदिरा आणि राज यांच्या लग्नामुळे त्यांचे कुटुंबिय फारसे आनंदी नव्हते. मंदिरा आणि राज यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुलगी ताराला दत्तक घेतले होते.





Source link

- Advertisement -