Raj Kundra Porn Case: ‘शिल्पा शेट्टीला क्लिन चीट दिलेली नाही’, कधीही होऊ शकते पुन्हा चौकशी

Raj Kundra Porn Case: ‘शिल्पा शेट्टीला क्लिन चीट दिलेली नाही’, कधीही होऊ शकते पुन्हा चौकशी
- Advertisement -


हायलाइट्स:

  • राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणी शिल्पा शेट्टीला क्लिन चीट दिलेली नाही
  • राज कुंद्राचा मेहुणा आणि अरविंद श्रीवास्तव ऊर्फ यश ठाकूरची चौकशी करणार
  • राज कुंद्राला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : राज कुंद्रा पॉर्नोग्राफी केस प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्राँच करत आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्व लोकांची चौकशी सुरू आहे. इतकेच नाही तर राज कुंद्रासह ११ जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राईम ब्राँचच्या अधिकाऱ्यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही चौकशी केली. याप्रकरणी अभिनेत्रीला अद्याप क्लिन चीट देण्यात आलेली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. याशिवाय अधिकाऱ्यांनी राजचा मेहुणा प्रदीप बक्शी आणि अरविंद श्रीवास्तव ऊर्फ यश ठाकूर यांचीही चौकशी करायची असल्याचे सांगितले. दरम्यान, राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

मुंबई क्राईम ब्राँचच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. याप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिटर नियुक्त करण्यात आले आहे. या दोघांच्याही खात्यांमधून झालेल्या व्यवहारांची सखोल चौकशी करणार आहेत. पोलिसांना संशय आहे की राजने त्याचा मेहुणा प्रदीप बक्शी याला केवळ एक प्यादे म्हणून वापरले आहे. परंतु हॉटशॉट्सचे सर्व व्यवहार राज कुंद्राच बघत होता. राजला अटक झाल्यानंतर या प्रकरणातील पीडितांनी पोलिसांशी संपर्क साधला असून त्यांचा जबाब नोंदवला आहे.

क्राईम ब्राँचच्या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, आरोपी अरविंद श्रीवास्तव उर्फ यश ठाकूरचे बँक खाते सीज केले आहे. त्यामध्ये ६ कोटी रुपये होते. त्याने हे खाते पुन्हा सुरू करण्याची मागणी पोलिसांना केली आहे. परंतु त्याने आधी पोलिसांसमोर हजर व्हावे आणि तपासात सहकार्य करावे असे त्याला सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टीच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. दुसरीकडे राज आणि शिल्पा यांचे बँक अकाउंटदेखील सील केले आहे. त्यामुळे सध्या तरी शिल्पाला कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नाहीए. दरम्यान, राज कुंद्राची पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. पोलिसांनी राजला आणखी काही दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालायने सर्व बाजू पडताळून राजला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.



Source link

- Advertisement -