हायलाइट्स:
- तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या वादळपीडितांना योग्य मदत मिळावी यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केंद्र सरकारकडून योग्य ती मदत मिळवून द्यावी- उपमुख्यमंत्री अजित पवार.
- महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून काय मदत हवी आहे, अशी विचारणा रामदास आठवले यांनी आपल्याला केल्यानंतर आपण आठवले यांना अशी विनंती केल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
- गुजरात राज्याने मागणी केली नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे- अजित पवार.
मुंबईतील मेट्रो-२ आणि मेट्रो-७ या दोन मार्गिकांचे उद्घाटनाच्या कार्यक्रमात अजित पवार उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी पवार बोलत होते. या कार्यक्रमात अजित पवार यांनी रामदास आठवले यांच्यापुढे राही प्रस्ताव सादर केले. यावेळी आठवले यांनी महाराष्ट्राला मदत करण्याची इच्छा बोलून दाखवली. तो धागा पकडून अजित पवार यांनी आठवले यांना केंद्राकडून महाराष्ट्रातील तौक्ते चक्रीवादळातील पीडितांना मदत मिळवून देण्याची विनंती केली. केंद्राने महाराष्ट्राला योग्य ती मदत द्यावी असे आवाहन यावेळी पवार यांनी केंद्र सरकारला केली.
गुजरात राज्याने मागणी केली नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे केंद्र सरकारने कोणतीही मदत जाहीर केलेली नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले.
क्लिक करा आणि वाचा- मेट्रोच्या चाचणीला हिरवा झेंडा, भाजपकडून मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शने
‘पूर्वी इतका भेदभाव कधीच झाला नव्हता’
या वेळी बोलताना अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. लोकप्रतिनिधी हे येतात आणि जातात. लोक त्यांना निवडून देत असतात. मात्र आता मात्र केंद्रातील सरकार भेदभाव करू लागले आहे. राज्यांना मदत देताना इतका भेदभाव कधीही झाला नव्हता, अशी टीका अजित पवार यांनी केद्रावर केली आहे.
क्लिक करा आणि वाचा- नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का, राज ठाकरेंच्या उपस्थितीत बड्या नेत्याचा मनसे प्रवेश
क्लिक करा आणि वाचा- कोविड योद्धे बनून बाहेर पडा; मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यावर संभाजीराजे म्हणाले…