२०१९ मध्ये ११८.२ कोटींची कमाई
२०२० मध्ये जेव्हा संपूर्ण देश करोनाच्या कैदेत होता तेव्हादेखील रणवीर आणि दीपिकाने ब्रँड अॅण्डॉर्समेन्ट मधून कोट्यवधींची कमाई केली होती. २०१९ मध्ये रणवीर सिंग ‘फोर्ब्स’ च्या ‘सेलिब्रिटी १०० लिस्ट’ मध्ये सातव्या स्थानावर होते. यावर्षी त्याची कमाई ११८.२ कोटी रुपये होती, तर दीपिका ४८ कोटींची कमाई करत यादीत दहाव्या स्थानावर होती.

२०१८ मध्ये १६०.८ कोटींची संपत्ती
दीपिका आणि रणवीरने २०१८ मध्ये लग्न केले. तेव्हा रणवीरची एकूण संपत्ती १६०.८ कोटी रुपये इतकी होती. अशाप्रकारे, जर आजच्या स्थितीत दोघांच्या मालमत्तेचा अंदाज लावला तर साधारण २५० ते ३०० कोटींच्या जवळ त्यांची मालमत्ता असेल. म्हणूनच आम्ही म्हणतो की रणवीर- दीपिका केवळ कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करत नाहीत तर ते कोट्यवधींच्या संपत्तीचे मालकही आहेत. एवढेच नाही तर या दाम्पत्याकडे आलिशान घराप्रमाणेच कोट्यवधी रुपयांच्या लक्झरी गाड्यांचा ताफाही आहे.

३.८ कोटींची अॅस्टन मार्टिन कार
रणवीर सिंगने २०१७ मध्ये वाढदिवसाला स्वत: ला अॅस्टन मार्टिन रॅपिड कार भेट म्हणून दिली. या कारची किंमत जवळपास ३.८ कोटी रुपये आहे. तेव्हा त्याच्या कारचा रंग पांढरा होता. पण आता त्याने कारचा रंग बदलला आहे. रणवीर आपल्या गाडीला स्काय ब्लू रंग दिला आहे. ही सुपरकार ३२७ किमी प्रतितास वेगाने धावू शकते.

रणवीरने घातले ३.२ लाखांचं जॅकेट
रणवीरचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. त्याच्या कपड्यांच्या डिझाईनिंगपासून ते कपड्यांचे रंग पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. रणवीर एकदा मुंबई विमानतळावर गुचीच्या कोटमध्ये दिसला होता. या कोटची किंमत ३.२ लाख रुपये आहे. यावरून एकट्या रणवीरच्या वॉर्डरोबमधील कपडे आणि शूजची एकूण किंमत किती असेल याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता.

२.६ कोटी रुपयांचं घड्याळ घालतो रणवीर
रणवीरला फक्त पैसे कमवायचा कसा एवढंच माहीत आहे असं नाही तर तो कसा खर्च करायचा हेदेखील माहीत आहे. त्याला फक्त कपडे, शूज किंवा लक्झरी कारच आवडतात असं नाही तर त्याला महागड्या घड्याळांची देखील आवड आहे. रणवीर Franck Muller या घड्याळ बनवणाऱ्या कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. इतकेच नाही तर त्याच कंपनीचे २.६ कोटी रुपयांचे घड्याळही तो वापरतो. हे घड्याळ पांढर्या सोन्याने बनविलेले आहे, ज्यावर हिरे जडलेले आहेत.

अलीकडे १.६ कोटींची नवीन एसयूव्ही खरेदी केली
रणवीर सिंगने अलीकडेच मर्सिडीजची नवीन एसयूव्ही Mercedes Benz GLS ही गाडी १.६ कोटी रुपयांमध्ये विकत घेतली. ही गाडी त्याने आपल्या आवडीनुसार तयार करून घेतली आहे.

३ कोटींची लॅम्बोर्गिनी, १.८५ कोटींची Maybach S 500
रणवीर सिंगच्या लक्झरी कारच्या ताफ्यात ३ कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी उरुस स्पोर्ट्स कार देखील आहे. याशिवाय त्यांच्याकडे मर्सिडीज- Maybach S 500 लक्झरी सेडान देखील आहे. त्याची किंमत १.८५ कोटी रुपये आहे. रणवीर सिंगकडे जॅग्वार एक्सजेएल देखील आहे, ज्याची किंमत ९९.५६ लाख रुपये आहे.

१५ कोटी आणि १० कोटी रुपये किंमतीची दोन आलिशान घरं
रणवीर सिंग मुंबईतील दोन आलिशान घरांचा मालक आहे. त्यापैकी प्रभादेवी परिसरातील ब्युमोंडे टॉवर्समधील एक अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत १५ कोटी रुपये आहे. तर त्याचं गोरेगाव येथे एक अपार्टमेंट देखील आहे, ज्याची किंमत १० कोटी रुपये इतकी आहे.