हायलाइट्स:
- रोहित पवार पोहचले आरोळे कोविड सेंटरमध्ये.
- करोना बाधित रुग्णांशी संवाद साधून दिला धीर.
- कोविड वॉर्डात रुग्णांना स्वत:च्या हाताने जेवणही वाढले.
वाचा: बारामतीत ५ मे पासून ७ दिवस कडक लॉकडाऊन; अजित पवार यांनी निर्देश देताच…
आरोळे कोविड केअर सेंटरचे संचालक डॉ. रवी आरोळे, पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यावेळी उपस्थित होते. अनेकदा करोना रुग्णांकडे त्यांचे नातेवाईक फिरकत नाहीत. ग्रामीण भागातील रुग्ण यामुळे मानसिक दृष्ट्या खचतात. आजारापेक्षा कोणी जवळ फिरकत नाही आपणास मोठा आजार झाला आहे, असे लोकांना वाटते. म्हणूनच आमदार पवार यांनी आरोळे कोविड सेंटर मधील करोना रुग्णांशी संवाद साधला. त्यांना जेवण वाढून विचारपूस केली. रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
वाचा: चंद्रकांत पाटलांनी माझा कोणता पुतण्या शोधून काढला?: छगन भुजबळ
आमदार पवार यांच्या पुढाकारातून कर्जत, जामखेड आणि नगर शहरातही कोविड केअर सेंटर उभारण्यात आली आहेत. तेथे शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. आपल्या मतदार संघातील आमदार स्वत: जेवण वाढत असून विचारपूस करीत आहे, हे पाहून रुग्णांना दिलासा मिळाला.
रोहित पवारांनी कोविड सेंटरमध्ये जाऊन करोना रुग्णांना दिला धीर, जेवणही वाढले
वाचा: विकृतीचा कळस! करोनाबाधित रुग्ण नोटांना थुंकी लावून रस्त्यावर फेकायचा