करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. करोनावरील लसीकरण मोहीमेला वेग देणं आणि जागतिक संकटात आवश्यक गोष्टी समजण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली आहे. आम्ही या संकटातू बाहेर पडू. पण यातून एकजुटीच्या भावनेचा मोठा धडा मिळाला आहे. भारत सध्या ज्या स्थितीतून जातोय, त्यातून बहुतेक देश गेले आहेत. त्यांना भारताबद्दल संवेदना आहेत, असं जयशंकर म्हणाले.
विदेशातून येणाऱ्या मदतीचे आभार
ब्रिटन, अमेरिका आणि आखाती देशांसह इतरांकडूनही अतिशय आवश्यक पुरवठा आणि मदत करत आहेत. हे जागतिक संकट एक बदल घेऊन आलं आहे आणि यामुळे विचारांमध्येही बदल होणार आहेत. आज कुटनितीत एकजुटता दिसून येत आहे, असं ते म्हणाले.
प्रादुर्भाव रोखण्यास सरकार अपयशी ठरले? जयशंकर म्हणाले…
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या जात आहेत. आरोग्य पथकं राज्यांमध्ये रवाना करण्यात आली आहेत. ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत. दुर्दैवाने करोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढला. पण ही वेळ दोष देण्याची नाही. पण आपण सुरक्षेत कुठलीही चूक केलेली नाही, हे देशात कुणीही सांगू शकतं, असं जयशंकर यांनी स्पष्ट केलं.
जी-७ राष्ट्र समूह बैठक: भारतीय शिष्टमंडळातील दोघांना करोनाची लागण
करोनाच्या या संकटात कुठल्याही प्रकारच्या गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी नाही. पण असेही प्रसंग येतात, ज्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. यासाठी कुणाला दोष देणं योग्य नाही. भारत हा लोकशाही देश आणि राजकीय देश आहे. एका लोकशाही देशात निवडणुका टाळू शकत नाही. निवडणुका अटळ आहेत, असं परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितलं.
coronavirus : सावधान! देशात करोनाची तिसरी लाट येणार, शास्त्रज्ञांनी दिला इशारा
गेल्या ७५ वर्षांमध्ये आपण आरोग्य व्यवस्थेत अतिशय कमी गुंतवणूक केली. यामुळे आता आरोग्य यंत्रणेचा पर्दाफाश झाला आहे. यामुळे आता आयुषमान भारत योजनेवर भर दिला जात आहे. आरोग्य हा मूलभूत अधिकार आहे. पण संकटावेळी जनतेला धोरणात्मक स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. त्यांना वास्तविक उत्तर पाहिजे. देशाला पुन्हा उभारी देण्यासाठी एक नव्हे तर अनेक योजनांवर काम केले जात आहे, अशी माहिती जयशंकर यांनी दिली.