हायलाइट्स:
- सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात जनता कर्फ्यू.
- उद्यापासून सात दिवस सर्व व्यवहार राहणार पूर्ण बंद.
- महापौर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय.
वाचा: बारामतीत ५ मे पासून ७ दिवस कडक लॉकडाऊन; अजित पवार यांनी निर्देश देताच…
गेल्या पंधरा दिवसांपासून सांगली शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रोज सुमारे एक हजार ते बाराशे नव्या रुग्णांची भर पडत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण आला असून नव्याने कोविड सेंटर उभी करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. लॉकडाऊन असून देखील रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी सांगली शहरात कडक जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाने घेतला आहे. बुधवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे. वैद्यकीय सेवा मेडिकल आणि दूध व्यवसाय वगळता अन्य सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही महापालिका प्रशासनाने दिला आहे.
वाचा: रोहित पवार यांनी करोना बाधित रुग्णांना जेवण वाढले आणि…
दरम्यान, करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या गावात करोना बाधितांची संख्या जास्त आहे, त्या गावात निर्बंध अधिक कडक करून जनता कर्फ्यूचे सक्तीने पालन करावे, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. जत येथील पंचायत समिती सभागृहात करोना संसर्गाच्या सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, विनाकारण बाहेर फिरताना आढळल्यास रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करा. आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स यांना दमदाटी केल्यास शासकीय कामात अडथळा या अनुषंगाने कडक कारवाई करा. हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्यांनाही होम आयसोलेशन करा. तसेच सौम्य लक्षणे जाणवणाऱ्यांनीही होम आयसोलेशन व्हावे. चेक पोस्टच्या ठिकाणी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात बंदोबस्त कडक करावा. प्राथमिक आरोग्य केंद्रांना जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. ॲम्बुलन्स सेवा सुरळीत ठेवावी. व्हेंटिलेटर तातडीने उपलब्ध करून घ्यावेत.
वाचा: शिवसेनेचे गुंड धमकावतात म्हणणाऱ्या अँकरकडून दिलगीरी; केलं ‘हे’ ट्वीट
करोना बाधित रुग्णांकडून डिपॉझिट भरून घेणाऱ्या रुग्णालयांचे ऑडिट करण्याच्या सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा कोटा २३ वरून ३५ टन करण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरेसा उपलब्ध करून देवू, असे ते म्हणाले. देशात ६० रेमडेसिवीअर उत्पादक असून, लोकसंख्येच्या प्रमाणात पुरवठा व्हावा, अशी केंद्राकडे मागणी केली आहे. रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहीम चांगली राबविण्यात येत असून लसीकरणात सांगली जिल्हा सर्वात पुढे आहे. १८ ते ४४ वयोगटातील तरुण वर्गाला मोफत लस देणार असून या वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.
वाचा: विकृतीचा कळस! करोनाबाधित रुग्ण नोटांना थुंकी लावून रस्त्यावर फेकायचा