Sangvi : चोरटयांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने, साड्यासह सिलेंडर पळविला

- Advertisement -

कुलूप लावून बंद असलेल्या घरातून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, साड्या आणि गॅस सिलेंडर चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 13) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे उघडकीस आली.

अभिषेक दशरथ गुमास्ता (वय 25, रा. नेताजी नगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक आणि त्यांच्या पत्नी विद्या बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घराला कुलूप लावून कवडेनगर, पिंपळे गुरव येथे त्यांच्या आईकडे गेले. आईकडे एक दिवस राहून ते गुरुवारी दुपारी परत नेताजी नगर येथील घरी आले.

दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून 25 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, 6 हजार रुपये किमतीच्या साड्या आणि एक गॅस सिलेंडर असा एकूण 31 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत..

- Advertisement -