हायलाइट्स:
- संजय राऊत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट.
- मातोश्री निवासस्थानी विविध मुद्द्यांवर दोन तास खलबतं.
- बैठकीनंतर प्रताप सरनाईक यांच्याबाबत केलं मोठं विधान.
वाचा: ‘आकडेवारी लपवली त्या राज्यांत मृतदेह गंगाकिनारी साचले’
प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर दोनच दिवसांपूर्वी माझे त्यांच्याशी फोनवरून बोलणे झाले आहे. त्यावेळी पत्रात मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, मी आजन्म शिवसेनेतच राहणार आहे, असे त्यांनी मला सांगितले आहे, असे राऊत यांनी नमूद केले. प्रताप सरनाईक यांच्याबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले. प्रताप सरनाईक यांच्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. ईडीच्या कारवायांवर आमचं बारीक लक्ष आहे. केंद्रीय पातळीवरून दबाव असू शकतो अशी एक शंका आहे. काही केंद्रीय यंत्रणा जाणूनबुजून वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. याकडे महाराष्ट्रातील जनतेनेही गंभीरपणे पाहण्याची गरज आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
वाचा: ‘या’ जिल्ह्यात डेल्टा प्लसचे ७ रुग्ण; निर्बंधांबाबत उचललं ‘हे’ कठोर पाऊल
राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. हे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपला कार्यकाळ पूर्ण करेल. महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यास मुख्यमंत्री सक्षम आहेत. त्यामुळे कुणी कितीही कंड्या पिकवल्या किंवा कितीही ढोल बडवले तरी काहीही साध्य होणर नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात राऊत म्हणाले.
पवार चुकीचं काय बोलले?
संजय राऊत हे शरद पवारांनाही भेटले होते. त्याचा संदर्भ देत पवारांचा मुख्यमंत्र्यांसाठी काही निरोप होता का, असे विचारले असता, पवारांचा मेसेज तेव्हाच मुख्यमंत्र्यांना दिला आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम करत आहेत आणि त्याचा फायदा निश्चितपणे भविष्यात महाविकास आघाडीला होणार असल्याचे पवारांनी सांगितल्याचे राऊत म्हणाले. देशात पर्यायी आघाडी उभी करायची असेल तर त्यात काँग्रेस, शिवसेनेसह सर्व प्रमुख विरोधी पक्ष असायला हवेत, असे पवार यांना वाटत आहे. मला तरी त्यात काहीच गैर वाटत नाही, असे राऊत म्हणाले. मुख्यमंत्री हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. आज त्यांच्यासोबत संघटनात्मक पातळीवरही चर्चा झाल्याचे राऊत म्हणाले.
वाचा:कोविड नियम मोडून वाढदिवस; आमदार संग्राम जगताप गोत्यात