हायलाइट्स:
- महाराष्ट्रात ऑपरेशन कमळची शक्यता नाही.
- संजय राऊत यांनी भाजपवर डागली तोफ.
- येथील घडामोडींचे हादरे दिल्लीसही बसतील!
पाहा: Live Updates: पंढरपुरात चुरशीची लढत; भगीरथ भालके आघाडीवर; अवताडे पिछाडीवर
‘पश्चिम बंगालच्या निकालानंतर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ सुरू केले जाईल, असे छातीठोकपणे सांगणारे लोक भेटतात तेव्हा आश्चर्य वाटते. जनतेला मूर्ख बनवणे जमू शकले, पण एक विषाणू तुम्हाला सत्तेवरून घालविण्याच्या कामास लागला आहे. आधी त्या विषाणूचा पराभव करा, असे मी या नेत्यांना सांगितले, असे राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरात नमूद केले आहे.
पाहा LIVE: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल तर आसाममध्ये भाजप आघाडीवर
आजच्या निकालानंतर अमित शहा हे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीत लक्ष घालतील, असे जे सांगितले जाते ते कशाच्या आधारावर? एक तर पैशांचा व बळाचा वापर करून आमदार फोडाफोडी केली जाईल किंवा करोना स्थिती हाताळण्यात अपयश आल्याचे कारण देऊन राष्ट्रपती राजवट लावली जाईल. करोना स्थितीचेच कारण असेल तर केंद्रातल्या सरकारलाही सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही हे आधी प्रामाणिकपणे स्वीकारायला हवे. औषधे व ऑक्सिजनअभावी रोज पाच हजारांवर चिता पेटत असताना हे राजकीय खेळ कोणाला सुचतात कसे? महाराष्ट्रात सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न आतापर्यंत फसले आहेत. या पुढेही ते यशस्वी होतील असे मला दिसत नाही. प. बंगालात ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो मोदी-शहा यांचा व्यक्तिगत पराभव मानायला हवा. एक राज्य जिंकण्यासाठी संपूर्ण देश करोना महामारीच्या खाईत ढकलण्याचे पाप यानिमित्ताने झाले हे आता सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगालाच आरोपी केले. महाराष्ट्र सरकारवरही उच्च न्यायालयाने प्रश्न उभे केले. हे सर्व राष्ट्रीय नियोजन व समन्वय कोसळल्यामुळेच झाले, अशी तोफ राऊत यांनी डागली आहे.
वाचा: ‘देशाला सत्य समजायला हवं’; पूनावालांच्या गौप्यस्फोटानंतर जितेंद्र आव्हाडांची मागणी
करोनामुळे देश आर्थिक डबघाईला आला असताना १००० कोटी खर्चाचा नवा संसद भवन उभारणीचा प्रकल्प हाती घेणे व राबवणे हे कोणत्या माणुसकीच्या व्याख्येत बसते? यावर आवाज उठवेल तो पुन्हा राजद्रोही ठरतो. पाकिस्तान, बांगला देशसारखी राष्ट्रे हिंदुस्थानला मदतीचा हात पुढे करीत आहेत. इतकी देशाची परिस्थिती ढासळली आहे. प. बंगालच्या निकालानंतर या परिस्थितीत कशी सुधारणा होणार? करोना महामारीमुळे देशात प्रचंड पडझड झालीच आहे. ‘आत्मनिर्भर’ हिंदुस्थानास मदत करण्यासाठी रशिया, सिंगापूर, अमेरिका, फ्रान्सपासून पाकिस्तान, बांगला देशपर्यंतची कार्गो विमाने दिल्लीच्या विमानतळावर उतरत आहेत. प. बंगालचे निकाल काहीही लागले तरी देशाची ही परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आज केंद्र सरकारात उरले आहे काय?, असा सवालही राऊत यांनी विचारला.
महाराष्ट्रात उद्यापासून घडामोडी होतील असे जे म्हणतात त्यांना माझा एकच प्रश्न आहे. महाराष्ट्रातील घडामोडींचे हादरे दिल्लीसही बसू शकतील असे वातावरण आज देशात आहे. पश्चिम बंगाल हा त्याचा केंद्रबिंदू असेल, असा इशाराच राऊत यांनी दिला. मोदी यांची लोकप्रियता आता घसरत आहे खरे, पण त्यांच्यासमोर उभे राहील असे नेतृत्व आज तरी नाही. पश्चिम बंगालच्या निकालानंतर ममता बॅनर्जी मोदीविरोधकांची गोळाबेरीज करून दिल्लीत ठाण मांडून बसतील, तेव्हा काय चित्र होईल? यावर पुढच्या घडामोडी अवलंबून आहेत, असेही राऊत यांनी नमूद केले आहे.
वाचा: Covid19: मद्रास हायकोर्टाची टिप्पणी जिव्हारी; EC ची सर्वोच्च न्यायालयात धाव