Home ताज्या बातम्या sanjay raut on rss: आरएसएस मुस्लिम भागात शाखा स्थापणार; संजय राऊत म्हणतात…

sanjay raut on rss: आरएसएस मुस्लिम भागात शाखा स्थापणार; संजय राऊत म्हणतात…

0
sanjay raut on rss: आरएसएस मुस्लिम भागात शाखा स्थापणार; संजय राऊत म्हणतात…

हायलाइट्स:

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (आरएसएस) मुस्लिम विभागात शाखा सुरू करण्याचा निर्णय.
  • शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आरएसएसच्या या निर्णयावर मांडले मत.
  • जर संघ बदलत असेल, तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला हवे- खासदार संजय राऊत.

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) मु्स्लिम विभागात शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आरएसएसच्या या निर्णयावर आपले मत मांडले आहे. जर संघ बदलत असेल, तर त्याकडे प्रयोग म्हणून पाहायला हवे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातील मुस्लिम समाजात काम करायचे ठरवले असून आता संघ बदलतोय. संघ का बदलतोय, असे विचारत संघाने आतापर्यंत हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली आहे. संघाने मतांसाठी धार्मिक विभाजन देखील केले. त्यात हिंदू आणि मु्स्लिमांचे बळी गेले. आता मात्र संघात बदल होत आहेत. पण जर संघाच्या अशा बदलण्यामुळे देशाच्या अखंडतेला जर बळ मिळणार असेल, तर याचा विचार व्हायला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- काँग्रेस नेते शरद पवार यांच्या घरी; पटोले अनुपस्थित, राजकीय वर्तुळात चर्चा

संघाचे काम नक्कीच चांगले आहे. संघाच्या काही भूमिका आहेत. त्यावर आम्ही चर्चाही केल्या आहेत. संघाला जर आता बदलावे असे वाटत असेल, तर त्याकडे एक प्रयोग म्हणून पाहायला पाहिजे, असेही राऊत पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- कौरवही त्यांचे, पांडवही त्यांचे…?; विजय वडेट्टीवार यांचा भाजपला टोला

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या चित्रकूट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखिल भारतीय प्रांत प्रचार बैठक आयोजित केली होती. संघाला अधिक सक्षम बनवण्यासाठी या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. काही पदांवरील नेमणूकांमध्ये बदलही करण्यात आले. या विषयावर देखील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

क्लिक करा आणि वाचा- शाळकरी मुलीचा पाठलाग करणाऱ्याला न्यायालयाने असा दिला दणका

काँग्रेसलाही लगावला टोला

काँग्रेस पक्ष हा १०० हून जुना असलेला पक्ष आहे. तो पक्ष तसा ऐतिहासिकही आहे. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता काँग्रेस पक्ष तर काही राज्यांमध्ये इतिहासजमा झालेला आहे, असे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला. नाना पटोले यांची वक्तव्ये फारशी चर्चेत नसतात, असा टोलाही त्यांनी पटोले यांना लगावला.

Source link