SBIची एफडीवरील व्याजदरात ७५% पर्यंत घट

- Advertisement -

नवी दिल्ली: भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) विविध मॅच्युरिटी असलेल्या ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेकडे मोठी रोकड असल्याने, तसेच व्याज दरात घट झाल्यामुळे हा निर्णय घेतला गेल्याचे एसबीआयने स्पष्ट केले आहे. नवे व्याजदर १ ऑगस्ट २०१९ पासून लागू होणार आहेत. 

अल्प मुदतीच्या १७९ दिवसांच्या एफडीवरील व्याजदरात ०.५ ते ०.७५ टक्क्यांची घट करण्यात आली आहे. अशा प्रकारे दीर्घ मुदतीच्या ठेवींवर रिटेल सेगमेंटमध्ये व्याजदरात ०.२० आणि बल्क सेगमेंटमध्ये ०.३५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. देशातील या सर्वात मोठ्या बँकेने दोन कोटी रुपये आणि त्यावरील ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. 

एसबीआयचा हा निर्णय एफडी गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय आहे. सरकारने एनपीएस, किसान विकास पत्र आणि पीपीएफसापख्या छोट्या बचत योजनांवरील व्याददरात देखील घट केली आहे. जूनमध्ये १० बेसिस पॉइंट्सच्या कपातीची घोषणाही बँकेने केली होती. तर, जूनमध्ये आरबीआयने केलेल्या रेपो दरातील कपातीनंतर बँकांनी एफडीवरील व्याजदरात कपात करण्यास सुरूवात केली. 

एसबीआयच्या वेबसाइटनुसार, प्रस्तावित दर नव्या आणि नुतनीकरण करण्याजोग्या (रिन्युएबन) ठेवींवर लागू करण्यात येणार आहेत. 

- Advertisement -